IND vs SA 2nd T20 : कर्णधार मार्करमचा गोलंदाजीचा निर्णय, आफ्रिका संघात महत्वपूर्ण बदल; जाणून घ्या Playing 11…

IND vs SA 2nd T20 (Playing XI Update) :- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चार सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना होत आहे. पहिल्या टी-20 लढतीत भारताने दक्षिण आफ्रिका संघाला 61 धावांनी पराभूत करताना, भारत व दक्षिण आफ्रिका संघाच्या दरम्यान सुरु असलेल्या चार सामान्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
दक्षिण आफ्रिका संघ पहिल्या लढतीत पराभूत झाल्याने जोरदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज असणार आहे तर पहिल्या लढतीसारखेच फलंदाजीच्या जोरावर लढत एकतर्फी करण्यासाठी भारतीय संघ तयार असेल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना रविवारी सेंट जॉर्ज पार्क स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. तर पहिला सामना रात्री 8.30 पासून खेळवण्यात आला. पहिला सामना डर्बन येथे झाला. या कारणास्तव त्याची वेळ वेगळी होती.
दरम्यान, त्यापूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल (Toss Update) हा दक्षिण आफ्रिकेच्या बाजूनं लागला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करम याने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (South Africa win the toss and elect to field) त्यामुळे भारतीय संघास प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरावं लागेल. भारताने या सामन्यासाठी प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे, तर दक्षिण आफ्रिकेने संघात एक बदल केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघात क्रुगेरच्या जागी रीझा हेंड्रिक्सला संधी देण्यात आली आहे.
🚨 Toss Update 🚨
South Africa win the toss and elect to field in the 2nd T20I.
Live – https://t.co/ojROEpNVp6#TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/7jD9qakDLg
— BCCI (@BCCI) November 10, 2024
IND vs SA Live Score : दोन्ही संघांची प्लेइंग-11 खालीलप्रमाणे…
भारतीय संघ : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, आवेश खान.
दक्षिण आफ्रिका संघ : एडन मार्करम (कर्णधार), रायन रिक्लेटन, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को जेन्सेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, नाकाबायोमझी पीटर.
IND vs SA 2nd T20 : सामना विनामूल्य कोठे पाहू शकाल….
टीम इंडिया या मालिकेत चार सामने खेळणार आहे. स्पोर्ट्स 18 (Sports 18) आणि कलर्स सिनेप्लेक्स (Colors Cineplex) या टीव्ही वाहिनीवर ही मालिका पाहता येईल. जर प्रेक्षकांना दुसरा टी-20 सामना मोबाईलवर पाहायचा असेल तर तेही शक्य आहे. यासाठी तुम्हाला जियो सिनेमा (Jio Cinema) ॲप डाउनलोड करावे लागेल. येथे तुम्ही सामना विनामूल्य पाहू शकता.
दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या सामन्याच्या दिवशी हवामान थंड राहू शकते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार तापमान 16 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. पावसाची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे सामन्यादरम्यान कोणतीही समस्या निर्माण होण्याची शक्यता नगण्य आहे.





