IND vs SA 1st T20I : ब्रिट्स आणि मॅरिझान कॅपची झंझावती अर्धशतके, द. आफ्रिकेचे भारतासमोर 190 धावांचे लक्ष्य…

IND vs SA 1st T20I Live Score : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना चेन्नई येथे खेळवला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 4 गडी गमावून 189 धावा केल्या. आफ्रिकेसाठी ब्रिट्सने सर्वाधिक 81 धावा केल्या. भारताकडून पूजा आणि राधाने 2-2 विकेट घेतल्या.
Innings Break!
South Africa post 189/4 in the first innings.
2⃣ wickets each for @Radhay_21 & @Vastrakarp25 👏👏#TeamIndia chase coming up shortly!
Scorecard ▶️ https://t.co/CCAaD4yVrY#INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/d0gVLGfLdT
— BCCI Women (@BCCIWomen) July 5, 2024
दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर लॉरा वोल्वार्ड आणि ब्रिटस यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघींमध्ये पहिल्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी झाली. कर्णधार लॉरा वोल्वार्ड 22 चेंडूत 33 धावा करून बाद झाली. राधा यादवने तिला बाद केले.
त्यानंतर मारिजन कॅप आणि ब्रिट्स यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 56 चेंडूत 96 धावांची भागीदारी झाली. 33 चेंडूत 57 धावा करून कॅप बाद झाली. तिलाही राधाने माघारी धाडलं. त्यानंतर क्लो ट्रायॉन 12 धावा करून माघारी परतली तर डावाच्या शेवटच्या चेंडूवर ब्रिट्सची 81 धावांची खेळी संपुष्टात आली. तिने आपल्या खेळीत 10 चौकार आणि तीन षटकार मारले. ट्रायाॅन आणि ब्रिटस या दोघींनाही पूजा वस्त्राकार हिने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.


