IND vs SA 1st T20I : जेमिमा रॉड्रिग्जची अर्धशतकी खेळी व्यर्थ, द. आफ्रिकेने भारताचा 12 धावांनी केला पराभव…

IND vs SA 1st T20I Match Result : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना चेन्नई येथे खेळला गेला. चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाने भारतीय संघाचा 12 धावांनी पराभव केला आहे. आफ्रिकेने दिलेल्या 190 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना प्रत्युत्तरात भारतीय महिला संघाला 20 षटकांत 4 गडी गमावून केवळ 177 धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. या विजयासह आफ्रिकेने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
विजयासाठी 190 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शेफाली वर्मा आणि स्मृती यांनी संघाला शानदार सुरुवात करून दिली. दोघींमध्ये पहिल्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी झाली. शेफाली 14 चेंडूत 18 धावा काढून बाद झाली. त्यानंतर मंधाना आणि हेमलता पाठोपाठ माघारी परतल्या. मंधाना हीने 30 चेंडूत 46 धावांची खेळी केली. तर हेमलता हि फक्त 14 धावा करून बाद झाली.
त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी भारताच्या विजयासाठी अखेरपर्यत प्रयत्न केले पण ते अपयशी ठरले. आधीच्या फलंदाजांनी संथ फलंदाजी केल्याने भारत विजयापासून वंचित राहिला. यादरम्यान जेमिमा रॉड्रिग्ज 30 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारासह 53 धावांवर नाबाद राहिली. तर कर्णधार हरमनप्रीत शेवटच्या चेंडूवर बाद झाली, तिने 29 चेंडूत 5 चौकारासह 35 धावा केल्या.
#TeamIndia put up a good fight but it was South Africa Women who won the first #INDvSA T20I in Chennai.
We will look to bounce back in the Second T20I of the series. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/CCAaD4zthw@IDFCFIRSTBank pic.twitter.com/eGyLIlwMiO
— BCCI Women (@BCCIWomen) July 5, 2024
तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 4 गडी गमावून 189 धावा केल्या होत्या. आफ्रिकेसाठी ब्रिट्सने सर्वाधिक 81 धावा केल्या. भारताकडून पूजा आणि राधाने 2-2 विकेट घेतल्या.
दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर लॉरा वोल्वार्ड आणि ब्रिटस यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघींमध्ये पहिल्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी झाली. कर्णधार लॉरा वोल्वार्ड 22 चेंडूत 33 धावा करून बाद झाली. राधा यादवने तिला बाद केले.
त्यानंतर मारिजन कॅप आणि ब्रिट्स यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 56 चेंडूत 96 धावांची भागीदारी झाली. 33 चेंडूत 57 धावा करून कॅप बाद झाली. तिलाही राधाने माघारी धाडलं. त्यानंतर क्लो ट्रायॉन 12 धावा करून माघारी परतली तर डावाच्या शेवटच्या चेंडूवर ब्रिट्सची 81 धावांची खेळी संपुष्टात आली. तिने आपल्या खेळीत 10 चौकार आणि तीन षटकार मारले. ट्रायाॅन आणि ब्रिटस या दोघींनाही पूजा वस्त्राकार हिने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.





