IND vs SA 1st T20 : पॅट्रिक क्रुगरचा अनोखा विक्रम, एका षटकात टाकले 11 चेंडू अन् शेवटच्या चेंडूवर….

IND vs SA 1st T20 (Patrick Kruger) – भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेलेला पहिला टी-20 सामना रोमहर्षक होता. डरबनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात एक अशी घटना घडली ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. वास्तविक, दक्षिण आफ्रिकेच्या एका गोलंदाजाने त्याचे एक ओव्हर इतके लांब टाकले की, ते पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले.
क्रुगरचा अनोखा पराक्रम
ही घटना भारताच्या डावाच्या नवव्या षटकात घडली. या षटकात वेगवान गोलंदाज पॅट्रिक क्रुगरने पहिल्या टी-20 सामन्यातील 9 व्या षटकात एकामागून एक असे तब्बल 11 चेंडू (1 ,4, NB1, 2, WD, NB ,WD, WD, 1 ,1, W) टाकले. पहिले दोन चेंडू त्याने अचूक टाकले होते पण तिसरा चेंडू नो बॉल होता. त्यानंतर चौथा चेंडू अचूक टाकला. त्याने पाचवा वाइड, सहावा नो बॉल टाकला आणि नंतर पुढचे दोन चेंडू वाईड टाकले. यानंतर पुढचे तीन चेंडू तो अचूक टाकू शकला. मात्र, शेवटच्या चेंडूवर त्याला सूर्यकुमारची विकेट मिळाली. क्रुगरचा हा पराक्रम सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
क्लासेनचे 100 षटकार
आफ्रिकेचा फलंदाज हेनरिक क्लासेनने भारताविरुद्धच्या टी-20 सामन्यात नक्कीच फलंदाजी केली नाही. परंतु असे असतानाही त्याने इतिहास रचला आहे. एका कॅलेंडर वर्षात 100 षटकार मारणारा तो दक्षिण आफ्रिकेचा पहिला फलंदाज ठरला आहे. एका कॅलेंडर वर्षात 100 षटकार मारणारा तो चौथा फलंदाज आहे.
चालू वर्षात उजव्या हाताच्या फलंदाजाने आफ्रिकन संघासाठी 53 टी-20 सामने खेळले आहेत. दरम्यान, त्याच्या बॅटमधून 100 षटकार लागले आहेत. सध्या 2024 संपायला दीड महिना बाकी आहे. त्यामुळे त्याच्या षटकारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.





