IND vs SA 1st T20 : द.आफ्रिकेचा भारताविरूध्द गोलंदाजीचा निर्णय, पहिल्या T20 साठी ‘अशी’ आहे दोन्ही संघांची Playing 11

IND vs SA 1st T20 ( Playing XI Update) : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना डर्बनमध्ये खेळवला जात आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या सामन्यातील नाणेफेकीचा कौल हा दक्षिण आफ्रिकेच्या बाजूनं लागला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करम याने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघास प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरावं लागेल. भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितले की, “टाॅस जिंकला असता तर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता.” पहिल्या T20 सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग 11 मध्ये एकूण सहा गोलंदाज आहेत.
🚨 Toss Update 🚨
South Africa win the toss in the 1st T20I and elect to field.
Live – https://t.co/0OuHPYbn9U#TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/6IuUahZ7pB
— BCCI (@BCCI) November 8, 2024
IND vs SA Live Score : दोन्ही संघांची प्लेइंग-11 खालीलप्रमाणे…
भारत : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, रवि बिश्नोई, आवेश खान, वरुण चक्रवर्ती.
दक्षिण आफ्रिका : रयान रिकेल्टन (यष्टीरक्षक), एडेन मार्करम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेविड मिलर, पार्ट्रिक क्रुगर, मार्को यानसेन, एंडिले सिमेलाने, गेराल्ड कोएत्जी, केशव महाराज, नकाबायोमजी पीटर.
हेड-टू-हेड रिकॉर्ड
टी-20I मध्ये हेड टू हेड रेकॉर्डमध्ये भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्चस्व दिसून येते . भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 27 टी-20 सामने खेळले गेले आहेत. भारताने 15 सामने जिंकले आहेत तर दक्षिण आफ्रिकेने 11 वेळा विजय मिळवला आहे. एका सामन्याचा निकाल लागला नाही. उभय संघांमधला शेवटचा सामना 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत झाला होता ज्यात भारताने जिंकून विजेतेपदावर कब्जा केला होता.
चाहत्यांना विनामूल्य पाहता येईल सामना…
चाहत्यांना भारत-दक्षिण आफ्रिका सामना विनामूल्य पाहता येणार आहे. मात्र यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये Jio ॲप डाउनलोड करावे लागेल. भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा ॲपवर होईल. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. प्रेक्षकांना टीव्हीवरही सामना पाहता येणार आहे. त्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 या टीव्ही चॅनलवर होईल.चाहत्यांना विनामूल्य पाहता येईल साम





