IND VS PAK : “आपण त्यांना दोष देऊ शकत नाही…”; भारत-पाकिस्तान सामन्यावर सुनिल शेट्टीचं मोठं वक्तव्य

Asia Cup 2025 । Ind vs pak match t t20 | Sunil shetty : पहलगाम हल्ल्यानंतर भारत – पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले असताना सुद्धा आशिया कप 2025 मध्ये भारत पाकिस्तान क्रिकेट संघांमध्ये सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जातेय. त्यामुळे यंदा भारत – पाक सामन्यापूर्वी फॅन्समध्ये म्हणावा तसा उत्साह नाही.
त्यामुळे दोन्ही संघ रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यासाठी उतरतील तेव्हा वातावरण अत्यंत तणावाचं असेल. महाराष्ट्रात तर या सामन्याला मोठा विरोध केला जात आहे. असे असतानात आता प्रसिद्ध अभिनेता सुनिल शेट्टी यांनी भारत-पाकिस्तान सामन्यावर मोठे भाष्य केले आहे.
#WATCH | Delhi: On India Vs Pakistan Asia Cup 2025 match, Actor Suniel Shetty says, “It’s a world sporting body. They have to abide by those rules and regulations because there are a lot of other sports and a lot of athletes who are involved in them. As Indians, I think that is… pic.twitter.com/cKHHVkyWi1
— ANI (@ANI) September 14, 2025
अभिनेता सुनिल शेट्टी काय म्हणाले?
माध्यमांशी बोलताना अभिनेता म्हणाला का, “हे सामने आयोजित करणारी संस्था जागतिक पातळीवरची आहे. त्यांना नियमांचे पालन करायचे असते. कारण यात इतरही काही खेळ आहेत. एक भारतीय म्हणून भारत-पाकिस्तान सामना पाहायचा किंवा पाहायचा नाही हा आपला व्यक्तिगत निर्णय आहे..” अशी प्रतिक्रिया सुनिल शेट्टी यांनी दिली.
तसेच, “आपल्याला हा सामना खेळायला जायचे आहे की जायचे नाही, याबाबतचा निर्णय भारताने घ्यायचा असतो. पण हा सामना खेळणाऱ्या क्रिकेटर्सना आपण यात दोष देऊ शकत नाही. कारण ते खेळाडू आहेत. त्यांना फक्त देशाचे प्रतिनिधित्त्व करायचे असते.
हा सामना पाहायचा की नाही याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. तुम्ही बीसीसीआयलाही दोष देऊ शकत नाही,” असेही पुढे बोलताना सुनिल शेट्टी म्हणाले. आता सुनिल शेट्टी यांच्या या विधानामुळे इंटरनेटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.





