IND vs PAK : चाहत्यांसाठी ‘हा’ रविवार ठरणार ‘सुपर संडे’! एकाच दिवशी दोनदा होणार भारत-पाक हाय-व्होल्टेज महामुकाबला

IND vs PAK Two Matches in 15 February : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे केवळ खेळ नसून ते एक युद्ध असते. आगामी फेब्रुवारी महिन्यात क्रिकेट चाहत्यांना या थराराचा दुप्पट आनंद मिळणार आहे. पुढच्या महिन्याच्या १५ तारखेला भारत आणि पाकिस्तान दरम्यान एकाच दिवशी दोन हाय-व्होल्टेज सामने खेळवले जाणार आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही सामने टी-२० फॉरमॅटमध्येच होणार असून वेळेतील फरकामुळे चाहत्यांना दोन्ही सामन्यांचा पूर्ण आनंद घेता येईल.
१. टी-२० विश्वचषक २०२६ (पुरुष संघ) –
टी-२० विश्वचषक २०२६ ला ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेत सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील सर्वात बहुप्रतिक्षित सामना १५ फेब्रुवारीला कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे. भारतीय पुरुष संघ पाकिस्तानचा सामना करण्यासाठी संध्याकाळी ७:०० वाजता मैदानात उतरेल.
२. वूमेन्स एशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ (महिला संघ)
𝟐𝟎𝟐𝟔 𝐢𝐬 𝐭𝐡𝐞 𝐲𝐞𝐚𝐫 𝐨𝐟 𝐰𝐨𝐦𝐞𝐧’𝐬 𝐜𝐫𝐢𝐜𝐤𝐞𝐭 ~ 𝐚𝐧𝐝 𝐢𝐭 𝐛𝐞𝐠𝐢𝐧𝐬 𝐰𝐢𝐭𝐡 𝐭𝐡𝐞 𝐧𝐞𝐱𝐭 𝐠𝐞𝐧𝐞𝐫𝐚𝐭𝐢𝐨𝐧 🌟
The #DPWorldWomensAsiaCupRisingStars2026 is set to bring bold performances, big moments and the future of Asian cricket to the forefront. pic.twitter.com/Vt4FgRy14A
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) January 19, 2026
पुरुष संघाच्या सामन्यापूर्वी, त्याच दिवशी १५ फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तानचे महिला ‘अ’ संघ एकमेकांशी भिडणार आहेत. थायलंडची राजधानी बँकॉक येथे आयोजित ‘एशिया कप रायझिंग स्टार्स’ स्पर्धेत दुपारी १२:३० वाजता हा सामना खेळवला जाईल.
एशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेचे स्वरूप:
- या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होणार असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे.
- ग्रुप-ए: भारत-ए, पाकिस्तान-ए, यूएई आणि नेपाळ.
- ग्रुप-बी: बांगलादेश-ए, श्रीलंका-ए, मलेशिया आणि यजमान थायलंड.
हेही वाचा – मोठी बातमी…! टी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यातून धडाकेबाज खेळाडू बाहेर! ‘या’ मालिकेलाही मुकला
भारतीय महिला ‘अ’ संघाचे वेळापत्रक (IST):
- १३ फेब्रुवारी: भारत-ए विरुद्ध युएई (दुपारी १२:३०)
- १५ फेब्रुवारी: भारत-ए विरुद्ध पाकिस्तान-ए (दुपारी १२:३०)
- १७ फेब्रुवारी: भारत-ए विरुद्ध नेपाळ (सकाळी ८:३०)
- २० फेब्रुवारी: सेमीफायनल
- २२ फेब्रुवारी: फायनल (दुपारी १२:३०)





