IND vs PAK : भारत-पाक फायनल सामन्यात टॉस ड्रामा; मुलाखतींवरून बीसीसीआय-पीसीबी भिडले!

IND vs PAK Pakistan Boycott India Ravi Shastri : आशिया कप 2025च्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव टॉसच्या वेळीही दिसून आला. टॉसदरम्यान दोन वेगवेगळ्या देशांचे समालोचकांनी आपापल्या देशाच्या कर्णधारांच्या मुलाखती घेतल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच टॉसवेळी दोन माजी खेळाडूंनी मुलाखती घेतल्या.
पाकिस्तानचा रवी शास्त्रींशी बोलण्यास नकार –
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने रवी शास्त्री यांच्याशी संवाद साधला, तर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याने वकार युनूस यांच्याशी चर्चा केली. दोन्ही समालोचकांनी आपापल्या देशाच्या खेळाडूंशी संवाद साधला. पाकिस्तान संघाला अंतिम सामन्यात भारतीय समालोचक शास्त्री यांच्याशी बोलण्याची इच्छा नव्हती.
TWO TOSS PRESENTERS! #RaviShastri #WaqarYounis #SalmanAliAgha #SuryakumarYadav pic.twitter.com/6t2z2v33yP
— CRICKETNMORE (@cricketnmore) September 28, 2025
प्रसारकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी भारत-पाकिस्तान सामन्यांदरम्यान टॉसवेळी शास्त्री यांनीच कर्णधारांशी संवाद साधला होता आणि अंतिम सामन्यातही त्यांनी सूर्यकुमार आणि सलमान यांच्याशी बोलणे अपेक्षित होते. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आशियाई क्रिकेट परिषदेकडे (एसीसी) तटस्थ समालोचकाची मागणी केली. एसीसीने जेव्हा बीसीसीआयशी संपर्क साधला, तेव्हा बीसीसीआयने स्पष्टपणे सांगितले की शास्त्री यांना हटवले जाणार नाही.
हेही वाचा – IND vs PAK Final : भारताचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय! प्लेइंग इलेव्हनमध्ये केले तीन मोठे बदल
टॉस फोटोशूटबाबत बीसीसीआयला कोणतीही माहिती दिली नव्हती –





