IND vs PAK : लंडनच्या मैदानात भारताने पाकिस्तानचा केला ७-१ ने गेम! पण सामना संपताच ‘या’ कृतीने जिंकली सर्वांची मनं
IND vs PAK : भारताने आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ७-१ अशा प्रचंड मोठ्या फरकाने धुव्वा उडवला. या धमाकेदार विजयासोबतच भारताने गुणतालिकेत स्पेनला मागे टाकत सातवे स्थान पटकावले आहे.

IND vs PAK India beat Pakistan by 7-1 Handshake Controversy : लंडनच्या ली व्हॅली हॉकी अँड टेनिस सेंटरमध्ये खेळल्या गेलेल्या एफआयएच प्रो लीग (FIH Pro League) हॉकीच्या सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताने आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ७-१ अशा प्रचंड मोठ्या फरकाने धुव्वा उडवला. या धमाकेदार विजयासोबतच भारताने गुणतालिकेत स्पेनला मागे टाकत सातवे स्थान पटकावले आहे. भारताचा हा पाकिस्तानविरुद्धचा सलग १७ वा विजय असून हॉकीमधील भारताचा दबदबा पुन्हा एकदा अधोरिखित झाला आहे. ( IND vs PAK)
मैदानावर तुटली क्रिकेटर्सची ‘नो हँडशेक’ पॉलिसी – (IND vs PAK)
या एकतर्फी महामुकाबल्याच्या समाप्तीनंतर लंडनच्या मैदानावर क्रीडा जगताला थक्क करणारा एक भावनिक क्षण पाहायला मिळाला. सामना संपताच दोन्ही देशांच्या खेळाडूंनी एकमेकांजवळ जात हस्तांदोलन केले. भारतीय हॉकी टीमचे हे पाऊल सध्या जगभर चर्चेचा विषय बनले आहे. कारण, २०२५ मधील पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानविरुद्ध ‘नो हँडशेक’ (हात न मिळवण्याची) कडक नीती अवलंबली होती.
𝐅𝐑𝐀𝐌𝐄𝐒 𝐎𝐅 𝐃𝐎𝐌𝐈𝐍𝐀𝐍𝐂𝐄. 📸🔥
A memorable outing in London as India produced a clinical performance to defeat Pakistan 7-1 in the FIH Hockey Pro League.
Swipe through the moments that made it special. 💙#DusSaalKaDabdaba #INDvsPAK #HockeyIndia #IndiaKaGame pic.twitter.com/EbPDk4GkyY
— Hockey India (@TheHockeyIndia) June 26, 2026
टी-२० आशिया चषकादरम्यान सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली क्रिकेटर्सनी हा निर्णय घेतला होता. त्यानंतर महिला आणि अंडर-१९ क्रिकेट टीमनेही पाकशी हँडशेक केला नव्हता. मात्र, भारतीय हॉकी संघाने हा कडक पवित्रा बाजूला ठेवत मैदानावर मैत्री आणि क्रीडा भावनेचा हात पुढे केला आहे.
IND vs PAK clash ho aur thoda masala na ho? Phir maza hi kya! 😂🔥
Aur dekho hamare Sarpanch Saab aur Jarmanpreet Singh ‘The Lion’ 🦁
dono ne akele hi poori Pakistan team ko challenge kar diya! 💪pic.twitter.com/czarUUgloB
— Sports Apna 🇮🇳 (@sportsapna1) June 27, 2026
१-० ने पिछाडीवर पडल्यानंतर भारताचे वादळ; हार्दिक ठरला हिरो – (IND vs PAK)
𝐃𝐀𝐁𝐃𝐀𝐁𝐀 𝐓𝐇𝐀. 𝐇𝐀𝐈. 𝐀𝐔𝐑 𝐑𝐀𝐇𝐄𝐆𝐀. 🇮🇳⚔️🇵🇰
Goals off penalty corners, a penalty stroke & stunning field efforts, topped up by unforgettable celebrations — this FIH Hockey Pro League clash had everything that makes Indian hockey special. 🏑💙
The Men in Blue… pic.twitter.com/91prjfkpFL
— Hockey India (@TheHockeyIndia) June 26, 2026
सामन्याच्या १३ व्या मिनिटाला पाकिस्तानच्या अबू महमूदने पेनेल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत पाकला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. मात्र, दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने सामन्याचा चेहरामोहराच बदलला. १९ व्या मिनिटाला सुखजीत सिंगने गोल करत भारताला १-१ अशा बरोबरीत आणले, तर २६ व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगने आपल्या सिग्नेचर स्टाईलमध्ये कडक ड्रॅग फ्लिक मारत भारताला २-१ ने आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या हाफमध्ये भारताने पाकच्या डिफेन्सच्या चिंधड्या उडवल्या. ३४ व्या मिनिटाला हार्दिक सिंगने पेनेल्टी स्ट्रोकवर, ३५ व्या मिनिटाला जुगराज सिंगने, तर ४१ व्या मिनिटाला अभिषेकने गोल करत स्कोर ५-१ केला. ४४ व्या मिनिटाला राजकुमार पाल आणि ५४ व्या मिनिटाला दिलप्रीत सिंगने गोल करत विजयावर ७-१ ने शिक्कामोर्तब केले. उत्कृष्ट खेळासाठी हार्दिक सिंगला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ घोषित करण्यात आले.





