IND vs PAK : BCCI आणि PCB यांच्यातील वादावर ICC घेणार निर्णय! पाकने सूर्याची तर भारताने फरहान-रौफची केली तक्रार

IND vs PAK Match Clashes : आशिया कप 2025 च्या सुपर 4 फेरीतील भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान दोन्ही संघांमधील तणाव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सामन्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे पीसीबी चांगलेच संतापले. यावरून पीसीबीने आयसीसीकडे भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तसचे बीसीसीआयने रौफ-फरहानची तक्रार केली आहे.
पाकिस्तानी खेळाडूंच्या आक्षेपार्ह वर्तनाने वाद –
सामन्यादरम्यान पाकिस्तानी खेळाडूंनी केलेल्या काही कृतींमुळे भारतीय चाहत्यांचा संताप वाढला. भारतीय फलंदाज अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांनी पाकिस्तानी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली, तेव्हा पाकिस्तानी खेळाडूंनी मैदानावर असभ्य वर्तन सुरू केले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये उपस्थित भारतीय चाहत्यांना आक्षेपार्ह इशारे केले.
The BCCI has lodged an official complaint with the ICC against Pakistan cricketers Haris Rauf and Sahibzada Farhan over their on-field gestures during the Asia Cup Super Fours match in Dubai last Sunday. #BCCI #HarisRauf #SahibzadaFarhan #ICC #Cricket #ZalmiTV pic.twitter.com/1NHcmeFoO9
— Zalmi TV (@zalmitvlive) September 25, 2025
त्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानी हवाई दलाने भारताचे सहा लढाऊ विमाने पाडल्याचा खोटा दावा करणारे इशारे केले. याशिवाय, पाकिस्तानी फलंदाज साहिबजादा फरहान याने अर्धशतकानंतर AK-47 रायफलने गोळीबार करत असल्याचा इशारा केला. या कृतींमुळे भारतीय संघ आणि चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली.
बीसीसीआय आणि पीसीबी दोन्ही बोर्डांनी केली तक्रार –
🚨 COMPLAINT AGAINST SURYAKUMAR YADAV 🚨
– PCB file 2 complaints against Suryakumar Yadav regarding his post match presentation statement and press conference’s statement. But Surya does not accept this allegation, so there will be a hearing on it. (Abhishek Tripathi). pic.twitter.com/bjTf2RH6BJ
— Tanuj (@ImTanujSingh) September 25, 2025
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हारिस रौफ आणि साहिबजादा फरहान यांच्या वर्तनाविरुद्ध आयसीसीकडे तक्रार नोंदवली. याला प्रत्युत्तर म्हणून पीसीबीनेही भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. याशिवाय, पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो विमान अपघाताचा इशारा करताना दिसत आहे. हा व्हिडिओ भारताविरुद्ध अप्रत्यक्षपणे टीका करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट आहे.
हेही वाचा – IND vs WI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर! जडेजाला मिळाली मोठी जबाबदारी
वादाची पार्श्वभूमी –
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यांमध्ये राजकीय तणाव नेहमीच दिसून येतो. यापूर्वी भारताने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय भारतातील पहलगाम दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर घेतला होता. या सामन्यातील पाकिस्तानी खेळाडूंच्या वर्तनाने हा वाद आणखी चिघळला आहे. आयसीसी या तक्रारींचा कशा पद्धतीने निपटारा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





