IND vs PAK : अभिषेक शर्माकडून शाहीन आफ्रिदीचे गर्वहरण! ७० सामन्यांचा अभिमान एका षटकारात नष्ट, पाहा VIDEO

IND vs PAK Abhishek Sharma’s Explosive Knock : भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्माने आशिया कप 2025 च्या सुपर-फोर सामन्यात पाकिस्तानविरुद्ध दमदार फलंदाजी केली. त्याने तडाखेबंद अर्धशतकीय खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले. त्याने 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 39 चेंडूंमध्ये 74 धावांची आतिशी खेळी केली, ज्यामध्ये 6 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. त्याच्या या खणखणीत खेळीमुळे भारताने 6 गडी राखून शानदार विजय मिळवला. त्याचबरोबर अभिषेकने आफ्रिदीच्या एका विक्रमाला तडा घालवला.
शाहीन आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर ठोकला षटकार –
अभिषेक शर्माने सामन्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह अफ्रिदीच्या पहिल्या चेंडूवर खणखणीत षटकार ठोकला. शाहीनने लेग स्टंपवर टाकलेल्या शॉर्ट पिच चेंडूचा अंदाज घेत अभिषेकने फाइन लेगच्या दिशेने उत्तुंग षटकार ठोकला. विशेष म्हणजे, शाहीनने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 70 वेळा पहिली ओव्हर टाकली आहे, जो पूर्ण सदस्य असलेल्या संघाच्या गोलंदाजासाठी दुसऱ्या क्रमांकाचा विक्रम आहे. मात्र, त्याच्या टी-20 कारकिर्दीत पहिल्या चेंडूवर कधीही षटकार पडला नव्हता. अभिषेकने हा विक्रम दुबईत मोडला आणि शाहीनच्या अब्रूला तडा दिला.
पहिल्या चेंडूवर दोनदा षटकार ठोकणारा पहिला भारतीय –
#INDvPAK🚨 Breaking: India crushes Porkistan again in Asia Cup T20 🇮🇳🔥#AbhishekSharma (74 off 39) and Shubman Gill (47 off 28) seal the win in style.
Don’t mess with Abhishek Sharma again. 🤨 #INDvPAK #AsiaCupT20 pic.twitter.com/1TXHiZkEvQ
— I’m Hindu🚩 (@bhavikshadhu) September 21, 2025
🚨 HISTORY BY ABHISHEK SHARMA 🚨
Abhishek Sharma becomes the FIRST Indian to smash a SIX off the very first ball of the innings — not once, but TWICE in T20Is! 🔥💪
What a fearless start from the young gun! 🏏💥#AbhishekSharma #PAKvIND #PakistanCricket pic.twitter.com/U4QZjZ7hTf
— Asia Voice 🎤 (@Asianewss) September 21, 2025
अभिषेकने याच सामन्यात आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. तो टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या पहिल्या चेंडूवर दोनदा षटकार ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी आशिया कप 2025 च्या गट टप्प्यातील सामन्यात त्याने यूएईचा गोलंदाज हैदर अलीच्या पहिल्या चेंडूवरही षटकार ठोकला होता. याआधी केवळ तीन भारतीय फलंदाजांनी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारले आहेत.
हेही वाचा – IND vs PAK : गौतम गंभीरच्या निर्देशाने IND vs PAK सामन्यात नवा वाद, हस्तांदोलनावरुन खळबळ! पाहा VIDEO
रोहित शर्माने 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध आदिल रशीदच्या चेंडूवर, यशस्वी जैस्वालने 2024 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध सिकंदर रझाच्या चेंडूवर, आणि संजू सॅमसनने यंदा इंग्लंडविरुद्ध जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर ही कामगिरी केली होती. अभिषेकच्या या आक्रमक खेळीने पाकिस्तानी गोलंदाजांचे मनोधैर्य खच्च झाले आणि भारताने हा सामना सहज जिंकला. 25 वर्षीय अभिषेक शर्माने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आणखी एक नवे पर्व सुरू केल्याचे या खेळीने दाखवून दिले.





