IND vs NZ 1st Test : टीम साऊदीने नावावर केला मोठा विक्रम; सेहवाग अन् रोहित शर्माला ‘या’ बाबतीत टाकलं मागे…

IND vs NZ 1st Test (Tim Southee) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी बंगळुरू येथे खेळली जात आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाचा डाव अवघ्या 46 धावांवर आटोपला. याला प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 402 धावा केल्या. न्यूझीलंडकडून रचिन रवींद्रने सर्वाधिक 134 धावांची खेळी खेळली. तर सलामीवीर ड्वेन कॉनवेने 91 धावा केल्या.
याशिवाय टीम साऊदीने 65 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. टीम साऊदीने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 4 षटकार मारले. यासह टीम साऊदीने कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि कर्णधार रोहित शर्माला मागे टाकले आहे.
कसोटी क्रिकटमध्ये टीम साऊदीच्या नावावर आता 93 षटकारांची मारल्याची नोंद झाली आहे. त्याचबरोबर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने 104 कसोटी सामन्यांमध्ये 91 षटकार मारले होते. याशिवाय टीम साऊदीने भारतीय कर्णधार रोहित शर्माला मागे टाकले आहे.
Tim Southee’s seventh half-century in Tests comes from just 57 balls with three fours and three sixes. He has now also gone past Virender Sehwag into sixth for the most Test career sixes (92) 🏏 #INDvNZ #CricketNation 📸 BCCI pic.twitter.com/zXiM8QCLFG
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 18, 2024
रोहित शर्माने 62 कसोटी सामन्यांमध्ये 87 षटकार मारले आहेत, परंतु आता टीम साऊदीने वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्माला मागे टाकले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत बेन स्टोक्स पहिल्या क्रमांकावर आहे. या इंग्लिश अष्टपैलू खेळाडूने कसोटी फॉरमॅटमध्ये आतापर्यंत 131 षटकार ठोकले आहेत.
त्याचबरोबर या यादीत बेन स्टोक्सनंतर माजी किवी फलंदाज ब्रेंडन मॅक्युलम 107 षटकारासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज ॲडम गिलख्रिस्ट 100 षटकारासह तिसऱ्या क्रमाकांवर आहे. यानंतर वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेल 98 तर दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस 97 षटकारासह अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमाकांवर आहे. या खेळाडूंनंतर टीम साऊथीचा सहावा क्रमांक लागतो. टीम साऊदीने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत 93 षटकार ठोकले आहेत.





