Rishabh Pant Injury Update : बंगळुरू कसोटीत टीम इंडियासाठी आतापर्यंत सर्व काही वाईट घडले आहे. फलंदाजांचा फ्लॉप शो आणि नंतर गोलंदाजांची खराब कामगिरी. मात्र, कठीण काळात भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना दुखापत झालेल्या ऋषभ पंतच्या दुखापतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
Rishabh Pant is fine and practicing batting during tea break.#RishabhPant pic.twitter.com/fEI5DC4gqq
— Arjun¹⁷ (@89at_gabba) October 18, 2024
तिसऱ्या दिवसाच्या टी-ब्रेकमध्ये पंत मैदानावर फलंदाजीचा सराव करताना दिसला. यावेळी त्याला कोणतीही अडचण आली नाही. तसेच त्यानंतर पंत टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये पायाला बॅटींग पॅड घालून बसलेला दिसला. त्यामुळे ऋषभ पंत टीम इंडियासाठी फलंदाजीसाठी सज्ज झाल्याचे दिसून येते. तो आता सामन्याच्या चौथ्या दिवशी शनिवारी फलंदाजीसाठी मैदानात उतरू शकतो.
— Sports In Veins (@sportsinveins) October 18, 2024
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर भारताने 3 गडी गमावून 231 धावा केल्या होत्या. यादरम्यान विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आणि सर्फराज खान चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येणार होता. पण कोहली आऊट झाल्यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबविण्यात आला. त्यामुळे पंत फलंदाजीसाठी मैदानात येऊ शकला नाही. मात्र आता तो चौथ्या दिवशी फलंदाजीसाठी मैदानात उतरू शकतो.
दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पंत सामन्यादरम्यानच मैदानाबाहेर गेला होता. कारण कार अपघातानंतर शस्त्रक्रिया झालेल्या पंतच्या गुडघ्याला चेंडू लागल्यामुळे त्याला दुखापत झाली होती.
तिसरा दिवसअखेर अजूनही भारत 125 धावांनी पिछाडीवर
चिन रवींद्र व टीम साउदी यांच्या आठव्या गड्यासाठी केलेल्या दमदार भागीदारीच्या जोरावर, न्यूझीलंडने पहिल्या डावात 402 धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या डावातील लाजिरवाण्या खेळानंतर भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी केली. भारताने दुसऱ्या डावात 3 बाद 231 धावा करताना चोख प्रत्युत्तर दिले. अनेक दिवसांपासून अडखळत असलेला विराट कोहली, पदार्पण करणारा सर्फराज खान व कर्णधार रोहित शर्मा यांनी दमदार अर्धशतके झळकाविताना भारताला सुस्थितीत आणले. तिसरा दिवसअखेर अजूनही भारत 125 धावांनी पिछाडीवर आहे.