HeartBreak! 99 धावांवर बाद झाला ऋषभ पंत! नर्व्हस नाईंटीज पाठ सोडेना…

IND vs NZ test Match : भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत पुन्हा एकदा नर्व्हस नाईंटीजचा शिकार ठरला. शतकाला अवघी एक धाव बाकी असताना पंत क्लिनबोल्ड झाल्याने सर्वांचीच निराशा झाली. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा दुसरा डाव सावरताना ऋषभ पंत याने 99 धावांची धडाकेबाज खेळी केली. अवघी एक धाव बाकी असताना तो क्लिनबोल्ड झाला.
पहिल्या डावात भारतीय संघाने अवघ्या 46 धावांमध्ये नांगी टाकली होती. प्रत्युत्तरात किवीजने 402 धावांचा डोंगर उभारत 356 धावांची आघाडी घेतली. यामुळे भारतीय संघाचा दुसरा डाव देखील दडपणाखाली असाच गडगडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
मात्र भारतीय फलंदाजांनी तडाखेबाज खेळी करत ही शक्यता साफ खोटी ठरवली.
ऋषभ पंत याने देखील आपली खास शैली दाखवत चौफेर धावा फाटकावल्या. अर्धशतक गाठल्यानंतर तर तो आणखी आक्रमक झाला, आणि न्यूझीलंडच्या गोलंदाजांची येथेच्छ धुलाई केली. पण शतकाच्या अगदी जवळ जाताच, तो त्रिफळाचित झाल्याने चाहत्यांची चांगलीच निराशा झाली.
खरं तर, रिषभ पंतच्या नर्व्हस नाईंटीजची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही तो पाच वेळा 90 धावांचा आकडा ओलांडल्यानंतर बाद झाला आहे. त्यात वेस्ट इंडीजविरोधात दोन वेळा 92 धावांवर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 97 इंग्लंडविरुद्ध 91 आणि श्रीलंकेविरुद्ध 97 धावा या खेळींचा समावेश आहे.
भारताकडे किरकोळ आघाडी | IND vs NZ test Match :
शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, भारतीय संघाने 6 गडी बाद 441 धावा बनवल्या होत्या. भारताकडे सध्या 85 धावांची किरकोळ आघाडी आहे. क्रीजवर रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन फलंदाजी करत आहेत. पाच दिवसीय कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस आहे.
दुसऱ्या डावातील भारताचा धावफलक | IND vs NZ test Match :
यशस्वी जैस्वाल – 35 (52 चेंडू), 5 चौकार, 0 षटकार, स्ट्राइक रेट: 67.31
स्टम्प्ड टॉम ब्लंडेल, बोल्ड एजाज पटेल
रोहित शर्मा (कर्णधार) – 52 (63 चेंडू), 6 चौकार, 1 षटकार, स्ट्राइक रेट: 82.54
बोल्ड एजाज पटेल
विराट कोहली – 70 (102 चेंडू), 8 चौकार, 1 षटकार, स्ट्राइक रेट: 68.63
झेलबाद टॉम ब्लंडेल, बोल्ड ग्लेन फिलिप्स
सरफराज खान – 150 (195 चेंडू), 18 चौकार, 3 षटकार, स्ट्राइक रेट: 76.92
झेलबाद एजाज पटेल, बोल्ड टिम साउथी
रिषभ पंत (यष्टीरक्षक) – 99 (105 चेंडू), 9 चौकार, 5 षटकार, स्ट्राइक रेट: 94.29
बोल्ड विल ओ’रॉर्क
के. एल. राहुल – 12 (16 चेंडू), 2 चौकार, 0 षटकार, स्ट्राइक रेट: 75.00
झेलबाद टॉम ब्लंडेल, बोल्ड विल ओ’रॉर्क
रवींद्र जडेजा – 5 (15 चेंडू), 1 चौकार, 0 षटकार, स्ट्राइक रेट: 33.33
झेलबाद विल यंग, बोल्ड विल ओ’रॉर्क
रविचंद्रन अश्विन – 2* (8 चेंडू), 0 चौकार, 0 षटकार, स्ट्राइक रेट: 25.00
नाबाद
अतिरिक्त धावा: 16 (नो बॉल 1, बाय 7, लेग बाय 8)
एकूण धावा: 441/7 (92.3 षटकांमध्ये)
पुढील फलंदाज
कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज





