IND vs NZ : टीम इंडियाने फायनलमध्ये लावली विक्रमांची रांग! टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला अद्भुत पराक्रम
IND vs NZ : भारतीय संघाने आक्रमक फलंदाजीच्या जोरावर अनेक विक्रमांना गवसनी घातली

IND vs NZ Team India Records T20 World Cup : टी-२० विश्वचषक २०२६ च्या विजेतेपदाच्या लढतीत टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडसमोर विजयासाठी २५६ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले आहे. बाद फेरीच्या दडपणाला झुगारून देत भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला आणि टी-२० विश्वचषक फायनलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. त्याचबरोबर भारतीय संघाने आक्रमक फलंदाजीच्या जोरावर अनेक विक्रमांना गवसनी घातली.
टॉप-३ फलंदाजांची ऐतिहासिक ‘फिफ्टी’ –
टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे जिथे एकाच संघाच्या पहिल्या तिन्ही फलंदाजांनी अर्धशतके झळकावली आहेत.
- संजू सॅमसन: ४६ चेंडूत ८९ धावांची वादळी खेळी.
- अभिषेक शर्मा: २१ चेंडूत ५२ धावांचे तुफानी अर्धशतक.
- इशान किशन: २५ चेंडूत ५४ धावांचे धडाकेबाज योगदान.
फायनलमध्ये पहिल्यांदाच २०० पेक्षा जास्त धावा –
Breathtaking batting 🤩
A scintillating partnership of 1⃣0⃣5⃣(48) between Sanju Samson and Ishan Kishan in the #Final 👏🤝
Updates ▶️ https://t.co/5LXBod8bl1#TeamIndia | #T20WorldCup | #MenInBlue | #INDvNZ | @IamSanjuSamson | @ishankishan51 pic.twitter.com/XucUaOOPpP
— BCCI (@BCCI) March 8, 2026
भारतीय संघाने १५ व्या षटकातच २०० धावांचा टप्पा ओलांडून नवा इतिहास रचला. विश्वचषकाच्या फायनलमध्ये २०० पेक्षा जास्त धावा करणारा भारत हा जगातील पहिलाच संघ ठरला आहे. भारताने निर्धारित २० षटकात ५ बाद २५५ धावा कुटल्या, जी विश्वचषक इतिहासातील तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. तसेच, भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सातव्यांदा २५० धावांचा आकडा पार केला आहे.
हार्दिक-शिवमचा अंतिम टप्प्यात धमाका –
सलामीवीरांनी रचलेल्या पायावर हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांनी कळस चढवला. शिवम दुबेने अवघ्या ८ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २६ धावा चोपल्या, तर हार्दिकने १८ धावांचे उपयुक्त योगदान दिले. या तुफानी फलंदाजीमुळे न्यूझीलंडसमोर आता २५६ धावांचे डोंगर उभे राहिले आहे.





