IND vs NZ : न्यूझीलंडचा ऐतिहासिक ‘मालिका विजय’! ३७ वर्षानंतर पहिल्यांदाच भारतात फडकवला झेंडा

IND vs NZ New Zealand Historic Win in India : न्यूझीलंड क्रिकेट संघाने भारत दौऱ्यावर आपला स्वप्नवत फॉर्म कायम राखत नवा इतिहास रचला आहे. कसोटी मालिकेतील ऐतिहासिक विजयानंतर, आता कीवी संघाने भारतीय भूमीवर पहिल्यांदाच एकदिवसीय (ODI) मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. रविवारी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ४१ धावांनी पराभव करत ३ सामन्यांची मालिका २-१ अशी आपल्या नावे केली.
मिचेल-फिलिप्सची शतके आणि कीवींचा डोंगर –
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने डॅरिल मिचेल (१३७) आणि ग्लेन फिलिप्स (१०६) यांच्या शानदार शतकांच्या जोरावर ३३७ धावांचे विशाल लक्ष्य भारतासमोर ठेवले होते. या दोन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजी फोडून काढत ऐतिहासिक भागीदारी रचली होती. भारताकडून गोलंदाजी करताना अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर सिराज आणि कुलदीपने प्रत्येकी एक विकेट्स घेतली.
What a game here in Indore!
Foulkes, Jamieson, Clarke and Lennox all getting into the wickets early.
Watch all the action live in NZ on Sky Sport.#INDvNZ | 📸 BCCI pic.twitter.com/M3LgpdbcWJ
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 18, 2026
विराटचं शतक ठरलं व्यर्थ –
A sight that never gets old, a sight we’re never tired of! 💯👑#ViratKohli’s 7th ODI century against New Zealand – most by any batter 🙌
Another run chase, another masterclass, and he knows the job is not done yet 🎯#INDvNZ | LIVE NOW 👉 https://t.co/CixSjUFkhU pic.twitter.com/0qf8wSXfVW
— Star Sports (@StarSportsIndia) January 18, 2026
३३८ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. मात्र, विराट कोहलीने खिंड लढवत आपल्या कारकिर्दीतील ५४ वे एकदिवसीय शतक झळकावले. विराटने शेवटपर्यंत झुंज दिली, पण दुसऱ्या बाजूने त्याला नितीश आणि हर्षित वगळता इतर कोणाकडूनही योग्य साथ मिळाली नाही. विराट कोहलीने १०८ चेंडूचा सामना करताना १० चौकार आणि ३ षटकार ठोकत १२४ धावांची खेळी साकारली. मात्र, तो भारतीय संघासा विजय मिळवून देऊ शकला नाही.
हर्षित राणाने ५२ आणि नितीश कुमार रेड्डीने ५३ धावांचे योगदान दिले. इतर भारतीय फलंदाज न्यूझीलंडच्या शिस्तबद्ध गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणामुळे भारतीय फलंदाज ठराविक अंतराने बाद होत राहिले. अखेरीस भारताचा डाव २९६ धावांवर आटोपला आणि भारताला ४१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. न्यूझीलंडसाठी झकरी फौल्क्स आणि क्रिस्टियन क्लार्क यांनी सर्वाधिक प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
भारतीय भूमीवर न्यूझीलंडचा ३७ वर्षांनी पहिलाच मालिका विजय –
भारत आणि न्यूझीलंड संघात १९८९ पासून वनडे मालिका खेळली जात आहे. न्यूझीलंडने यापूर्वी भारतात अनेक एकदिवसीय मालिका खेळल्या आहेत, मात्र त्यांना कधीही मालिका जिंकता आली नव्हती. ३७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर कीवींनी हा दुष्काळ संपवला आहे. कसोटी मालिकेनंतर वनडेतही भारताला त्यांच्याच घरात धूळ चारल्यामुळे न्यूझीलंडच्या या संघाचे जगभरात कौतुक होत आहे.





