Champions Trophy 2025 : रोहित सर्वकाही विसरतो, पण ‘विसरायचं’ विसरत नाही…! पत्रकार परिषदेतील मजेशीर VIDEO व्हायरल

Rohit Sharma forgets Champions Trophy in press conference : टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली न्यूझीलंडवर ४ विकेट्सनी मात करत तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं. ही ट्रॉफी भारतीय संघाने तब्बल १२ वर्षांनंतर जिंकली. याआधी भारतीय संघाने २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. न्यूझीलंडला हरवून भारताने जेतेपद जिंकले, पण सामन्यानंतर पत्रकार परिषदेत रोहित शर्माने असं काही केलं की, सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
रोहित शर्मा ठरला सामनावीर –
रोहितच्या नेतृत्वाखाली, मेन इन ब्लूने ९ महिन्यांत २ ट्रॉफी जिंकल्या आहेत. ९ मार्च २०२५ रोजी खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात रोहितने ८३ चेंडूत ७६ धावांची शानदार खेळी केली. या खेळीसाठी त्याला सामनावीर सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. यानंतर रोहितची पत्रकार परिषद पार पडली. तो विसरभोळा आहे, हे तर सर्वांना माहित आहे. पण तो पत्रकार परिषदेनंतर ट्रॉफी घेऊन जायची विसरेल, असे कोणालाच वाटणार नाही. मात्र, तसे घडले ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Captain @ImRo45 leading from the front!
He is adjudged Player of the Match for his match winning knock of 76 runs as #TeamIndia win the Champions Trophy 👏👏 pic.twitter.com/QCICyAfkIs
— BCCI (@BCCI) March 9, 2025
पत्रकार परिषदेत रोहित ट्रॉफी विसरला –
https://t.co/T8SDDlnVfL pic.twitter.com/Wliat5NOjr
— Devendra Pandey (@pdevendra) March 9, 2025
रोहित शर्माने निवृत्तीच्या अटकळांना पूर्णविराम दिला आणि पत्रकार परिषदेतून बाहेर पडला. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी टेबलावरच विसरला. यानंतर तिथे उपस्थित असलेल्या एका स्टाफ मेंबरने ट्रॉफी उचलली आणि भारतीय कर्णधाराला दिली. रोहित ट्रॉफी विसरल्याची ही क्लिप आता व्हायरल होत आहे. तुम्ही खाली संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता.
रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताने आयसीसी स्पर्धेत फक्त एकच सामना गमावला –
One Team
One Dream
One Emotion!🇮🇳🇮🇳🇮🇳#TeamIndia pic.twitter.com/MbqZi9VGoG
— BCCI (@BCCI) March 9, 2025
रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने न्यूझीलंडच्या २५२ धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना ४९ षटकांत ६ गडी गमावून लक्ष्य गाठले. विशेष गेल्या ३ आयसीसी स्पर्धांमध्ये भारतीय संघाने शानदार कामगिरी केली. या स्पर्धांमध्ये फक्त १ सामना गमावला आहे. तो सामना ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विश्वचषक अंतिम सामना होता. आयसीसी स्पर्धेत इतका यशस्वी ठरणारा रोहित शर्मा भारताचा पहिलाच कर्णधार आहे.
रोहित शर्माची एकदिवसीय कारकीर्द –
गेल्या वर्षी आयसीसी टी-२० विश्वचषकातील भारताच्या विजयानंतर रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. २००७ मध्ये सुरू झालेल्या त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत रोहितने आतापर्यंत २७३ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ११,१६८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याचा सर्वोच्च धावसंख्या २६४ धावा आहे, जो त्याने २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध केला होता. रोहित शर्माने ५ सामन्यांच्या ५ डावात ३६ च्या सरासरीने १८० धावा केल्या. त्याने २१ चौकार आणि ६ षटकार मारले.





