IND vs NZ : न्यूझीलंडला मोठा धक्का! भारताविरुद्ध मागील सामन्यात पाच विकेट्स घेणारा स्टार गोलंदाज फायनलमधून बाहेर

IND vs NZ Final Match Matt Henry ruled out : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना ९ मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जात आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंड संघात एक बदल झाला आहे. दुखापतीमुळे मॅट हेन्री या सामन्यातून बाहेर पडला आहे. मॅट हेन्री हा न्यूझीलंडच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. अशा परिस्थितीत, अंतिम फेरीपूर्वी त्याचे बाहेर पडणे न्यूझीलंडसाठी मोठा धक्का आहे, तर भारतासाठी ही दिलासादायक बातमी आहे.
न्यूझीलंडला मोठा झटका –
दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य सामन्यादरम्यान मॅट हेन्रीला खांद्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो आता न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातून बाहेर पडला आहे. सामन्यापूर्वी नाणेफेकीसाठी आलेल्या कर्णधार मिचेल सँटनरने ही माहिती दिली. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात एक झेल घेताना जबरदस्त डायव्हिंग केली होती. त्यावेळी त्याच्या खांद्याला दुखापत होती. त्याने मागील भारताविरुद्धच्या सामन्यात ५ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या होत्या. आता न्यूझीलंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याच्या जागी वेगवान गोलंदाज नॅथन स्मिथला संधी देण्यात आली आहे. त्याने
New Zealand dealt huge injury blow ahead of the #ChampionsTrophy Final against India.
Details ⬇️ https://t.co/7nabrOEdOy
— ICC (@ICC) March 9, 2025
भारताने सलग १५ वनडे सामन्यात गमावली नाणेफेक –
भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यात सलग १५ व्यांदा नाणेफेक गमावली आहे. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतर संघाने नाणेफेक जिंकलेली नाही. या काळात, भारतीय संघाने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका, श्रीलंकेविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका, इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसह पाचही सामन्यांमध्ये नाणेफेक गमावली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलसाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
न्यूझीलंड: विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), काइल जेमिसन, विल्यम ओ’रोर्क, नॅथन स्मिथ.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.





