IND vs NZ : भारताने १२ वर्षांनंतर रचला इतिहास! तब्बल तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरलं नाव

IND vs NZ India Won the Champions Trophy for the 3rd Time : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला चार विकेट्सने पराभूत करून विजेतेपद पटकावले आहे. हे भारताचे हे आयसीसी स्पर्धेतील सलग दुसरे जेतेपद आहे. यापूर्वी २०२४ मध्ये टीम इंडियाने टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर भारताने १२ वर्षांनंतर तिसरी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. भारताने २५२ धावांचे लक्ष्य ४९ षटकांत ६ विकेट्स गमावून पूर्ण केले. भारतासाठी कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ७६ धावांचे योगदान दिले.
भारताने सातव्यांदा आयसीसी ट्रॉफीवर कोरलं नाव –
ही भारताची सातवी आयसीसी ट्रॉफी आहे. यापूर्वी, संघाने १९८३ आणि २०११ चा एकदिवसीय विश्वचषक, २००७ आणि २०२४ चा टी-२० विश्वचषक आणि २००२, २०१३ आणि २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. संपूर्ण स्पर्धेत भारत अपराजित राहिला. भारतीय संघाने सलग पाच सामने जिंकत चॅम्पियन्स ट्रॉफीवर तिसऱ्यांदा नाव कोरले.
𝗖. 𝗛. 𝗔. 𝗠. 𝗣. 𝗜. 𝗢. 𝗡. 𝗦! 🇮🇳🏆 🏆 🏆
The Rohit Sharma-led #TeamIndia are ICC #ChampionsTrophy 2025 𝙒𝙄𝙉𝙉𝙀𝙍𝙎 👏 👏
Take A Bow! 🙌 🙌#INDvNZ | #Final | @ImRo45 pic.twitter.com/ey2llSOYdG
— BCCI (@BCCI) March 9, 2025
रोहितने फायनलमध्ये दाखवला आपला क्लास –
Captain @ImRo45 leading from the front!
He is adjudged Player of the Match for his match winning knock of 76 runs as #TeamIndia win the Champions Trophy 👏👏 pic.twitter.com/QCICyAfkIs
— BCCI (@BCCI) March 9, 2025
दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या जेतेपदाच्या सामन्यात, नाणेफेक जिंकल्यानंतर, न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना ५० षटकांत ७ गडी गमावून २५१ धावा करण्यात यश आले. लक्ष्याचा पाठलाग करताना, रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने भारतीय संघाला चांगली सुरुवात दिली, या अंतिम सामन्यात टीम इंडियाला कर्णधार रोहितकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती आणि त्याची त्यांना गरज होती. संपूर्ण स्पर्धेत रोहितच्या बॅटमधून एकही मोठी खेळी आली नव्हती. मात्र, त्याने अंतिम सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावून सर्वांची मनं जिंकली.
रोहित-शुबमनने पहिल्या विकेट्ससाठी साकारली शतक भागीदारी –
Going strong and how 💪💪
An opening partnership of 100 runs in the Finals of the Champions Trophy 👏👏
Live – https://t.co/uCIvPtzs19 #INDvNZ #ChampionsTrophy #Final pic.twitter.com/0XAwKZavBy
— BCCI (@BCCI) March 9, 2025
रोहितने ८३ चेंडूत सात चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७६ धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर शुबमन गिल (३१) सोबत शतकी भागीदारी केली. परंतु, त्यानंतर भारताला दोन मोठे धक्के बसले. शुबमन गिलनंतर विराट कोहली (१) देखील पॅव्हेलियनमध्ये परतला. लवकरच कर्णधार रोहितनेही आपली विकेट गमावली. त्यानंतर, श्रेयस अय्यर (४८) आणि अक्षर पटेल यांनी ६१ धावा जोडून संघाचे सामन्यात पुनरागमन केले. श्रेयस अर्धशतक हुकले आणि त्यानंतर अक्षर पटेल (२९) देखील लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतला. पण केएल राहुल (नाबाद ३४) आणि हार्दिक पंड्या यांनी संघाला विजयाच्या खूप जवळ आणले. हार्दिक विजयापूर्वीच (१८) बाद झाला. पण केएल राहुलने (३४) रवींद्र जडेजासह (९) संघाला जेतेपद मिळवून दिल्यानतंर सुटकेचा नि:श्वास सोडला.
भारताचा फिरकीसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी टेकले गुडघे –
.@imkuldeep18 right on the money.
Picks up his second wicket as Kane Williamson is caught and bowled for 11 runs 👏👏
Live – https://t.co/OlunXdzr5n #INDvNZ #ChampionsTrophy #Final pic.twitter.com/cddLceHDWz
— BCCI (@BCCI) March 9, 2025
तत्पूर्वी न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ७ गडी गमावून २५१ धावा केल्या होत्या. किवी संघाकडून मायकेल ब्रेसवेलने ४० चेंडूत ५३ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या बॅटमधून ३ चौकार आणि २ षटकार लागले. तर डॅरिल मिशेलने १०१ चेंडूत ६३ धावा केल्या. त्याच्या बॅटमधून ३ चौकार आले. भारताकडून वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. जिथे वरुण चक्रवर्तीने १० षटकांत ४५ धावा दिल्या आणि कुलदीप यादवने १० षटकांत ४० धावा दिल्या. तर हार्दिक पंड्याने ३ षटकांत ३० धावा दिल्या आणि मोहम्मद शमीने ९ षटकांत ७४ धावा दिल्या.





