IND vs NZ 1st Test : बंगळुरू कसोटीबदल मोठी अपडेट, सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या वेळेत बदल….

IND vs NZ 1st Test (Day 2 Time Update) : संततधार पावसामुळे बंगळुरू येथे खेळल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता दुसऱ्या दिवसाच्या वेळेत काहीसा बदल करण्यात आला आहे. याबाबत बीसीसीआयनं ट्विटरवरून माहिती दिली आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेच्या पहिल्या दिवशी नियोजित वेळेनुसार सामन्याआधी सकाळी 9 वाजता टॉस आणि 9 वाजून 30 मिनिटांनी खेळाला सुरुवात होणं अपेक्षित होतं. मात्र पाऊस सुरु असल्याने टॉसही होऊ शकला नाही. त्यानंतर आता दुसऱ्या दिवसाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. दरम्यान आता दुसऱ्या दिवशी 8 वाजून 45 मिनिटांनी टॉस होणार आहे आणि त्यानंतर सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी सामन्याला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.
पहिले सत्र (सकाळी) : 9:15 ते 11:30
दुसरे सत्र (दुपारी) : 12:10 ते 02:25
तिसरे सत्र (संध्याकाळी) : 02:45 ते 04 :45
🚨 Update from Bengaluru 🚨
Day 1 of the 1st #INDvNZ Test has been called off due to rain.
Toss to take place at 8:45 AM IST on Day 2
Start of Play: 9:15 AM IST #TeamIndia | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/RzmBvduPqr
— BCCI (@BCCI) October 16, 2024
सामन्याबाबत, असा निर्णय घेण्यात आला आहे की सामना 15 मिनिटे आधी सुरू होईल आणि त्यानंतर प्रत्येक सत्रात 15 मिनिटे जोडली जातील. कसोटी क्रिकेटमध्ये एका दिवसात सुमारे 90 षटके खेळली जातात. पण भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील पहिल्या सामन्यात प्रत्येक सत्रात थोडा वेळ जोडून किमान 98 षटके टाकण्याचा प्रयत्न केला जाईल. जरी यामुळे पूर्णपणे भरपाई होणार नाही, परंतु काही षटके निश्चितपणे संरक्षित केली जाऊ शकतात.
IND vs NZ 1st Test (Day 1) : पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द, टॉसही होऊ शकला नाही….
दरम्यान, या सामन्यावर पावसाचं सावट असल्याचं आधीपासूनच स्पष्ट होतं. तसेच या सामन्यात उर्वरित 4 दिवसही पाऊस होण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. अशात हा सामना रद्द होण्याची दाट शक्यता आहे. आता दुसऱ्या दिवशी तसेचे पुढे वरुणराजाच्या कृपेमुळे सामना होणार का? याकडे साऱ्यां क्रिकेटप्रेमीचं लक्ष असणार आहे.





