IND vs ENG : झॅक क्रॉलीच्या ‘त्या’ कृतीने सिराज संतापला! मैदानावर तणावाचे वातावरण, VIDEO व्हायरल

IND vs ENG Crawley Siraj Tensions Flare : लीड्स कसोटीच्या पाचव्या दिवसाचे पहिले सत्र इंग्लंडच्या फलंदाजांनी गाजवले. लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडने एकही गडी न गमावता ११७ धावा केल्या, ज्यामुळे भारतीय गोलंदाजांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले. मात्र, लंच ब्रेकपूर्वी शेवटच्या षटकात मोहम्मद सिराज आणि इंग्लंडचा फलंदाज झॅक क्रॉली यांच्यात घडलेल्या एका घटनेमुळे मैदानावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. ही घटना केवळ खेळाच्या रणनीतीचा भाग नव्हती, तर तिने दोन्ही संघांमधील तणावही दर्शवला.
लंच ब्रेकपूर्वी भारत-इंग्लंडमध्ये दिसला तणाव –
पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज झॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांसारख्या वेगवान गोलंदाजांना या सत्रात एकही विकेट घेता आली नाही. इंग्लंडच्या फलंदाजांनी केवळ भारतीय गोलंदाजीचा सामना केला नाही, तर धावगतीही कायम ठेवली. पण या शांत आणि एकतर्फी सत्रात शेवटच्या षटकात तणाव पाहिला मिळाला.
नक्की काय घडलं?
Indian pacer Mohammed Siraj was seen getting involved in an altercation with the England openers ahead of the lunch break on Day 5. 🤯🏏
📸: JioHotstar/X#oneturfnews #engvsind #testcricket #mohammedsiraj #zakcrawley #cricket pic.twitter.com/znpZLbyv0r
— OneTurf News (@oneturf_news) June 24, 2025
लंच ब्रेकपूर्वी शेवटचे षटक मोहम्मद सिराज टाकत होता. कारण भारतीय संघाची रणनीती होती की लंचच्या वेळेपूर्वी आणखी एक ओव्हर टाकता यावा, जेणेकरून इंग्लंडच्या फलंदाजांवर दबाव निर्माण होईल. सिराजने शेवटचे षटक लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तो झटपट धावत्या रनअपवर आला.
View this post on Instagram
त्याचवेळी फलंदाजी करणारा झॅक क्रॉली जाणीवपूर्वक क्रीझमधून बाजूला झाला. खरं तर, त्याने हे वेळ संपवण्यासाठी केलं, ज्यामुळे भारताला आणखी एक षटक टाकता येऊ नये आणि बुमराहचा सामना करावा लागू नये. यामध्ये, क्रॉली यशस्वी झाला आणि भारतीय संघाला आणखी एक षटक टाकता आले नाही.
हेही वाचा – IND vs ENG : ‘…तर मग त्याला खेळवता कशाला?’, संतप्त दिनेश कार्तिकने संघ व्यवस्थापनाला सुनावले खडे बोल
टीम इंडियाचे खेळाडू संतापले –
या घटनेमुळे भारतीय संघात नाराजी पसरली. आपल्या आक्रमकतेसाठी आणि उत्साहासाठी ओळखला जाणार सिराज या कृतीमुळे प्रचंड नाराज दिसला. भारतीय कर्णधार गिल आणि इतर खेळाडूंनीही क्रॉलीच्या या कृतीवर आपला राग व्यक्त केला. मैदानावर काही क्षणांसाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले, ज्यामुळे हा विषय आणखी चर्चेचा बनला. तथापि, ही कृती कोणत्याही नियमाविरुद्ध नव्हती. अनेकदा खेळाडू रणनीतीचा भाग म्हणून असे करतात. परंतु, सोशल मीडियावर भारतीय चाहते या घटनेची निंदा करत असून इंग्लंडच्या फलंदाजावर बेईमानीचा आरोप करत आहेत.





