IND vs ENG : जैस्वाल-आकाशच्या भागीदारीने रचला इतिहास! ठरली २१व्या शतकातील विक्रमी शतकीय भागीदारी

IND vs ENG Test Series Sets 21st Century Partnership Record : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत रोमांचक लढती पाहायला मिळत आहेत. सध्या भारतीय संघ १-२ ने पिछाडीवर आहे. पाचव्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने शतक आणि आकाश दीपने अर्धशतक झळाकवले. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १०७ धावांची शानदार भागीदारी साकारली. ज्यामुळे एका मोठ्या इतिहासाची नोंद झाली.
२१व्या शतकातील विक्रमी शतकीय भागीदारी –
या मालिकेत दोन्ही संघांच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडत इतिहास रचला आहे. आतापर्यंत या कसोटी मालिकेत आतापर्यंत दोन्ही संघांतील खेळाडूंनी मिळून एकूण १८ शतकीय भागीदाऱ्या केल्या आहेत, जो २१व्या शतकातील सर्वाधिक शतकी भागीदाऱ्याचा विक्रम ठरला आहे. यापूर्वी २००३-०४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये १७ शतकीय भागीदाऱ्या झाल्या होत्या. २१ वर्षांनंतर हा विक्रम मोडला गेला आहे.
शुबमन गिलने रचला धावांचा डोंगर –
A valuable fifty-run partnership for the third wicket and a positive start to Day 3! 🙌
Yashasvi Jaiswal 🤝 Akash Deep#TeamIndia reach 121/2, lead by 98 runs
Updates ▶️ https://t.co/Tc2xpWNayE#ENGvIND pic.twitter.com/zEhTUZuatA
— BCCI (@BCCI) August 2, 2025
भारतीय कर्णधार शुबमन गिलने या मालिकेत सर्वाधिक ७५४ धावा केल्या असून, त्याने चार शतके ठोकली आहेत. केएल राहुल ५३२ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने दोन शतके लगावली. ऋषभ पंत दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर आहे, पण त्याने चार सामन्यांत ४७९ धावा आणि दोन शतके केली. रवींद्र जडेजा (४६३ धावा) आणि वॉशिंगटन सुंदर (२३१ धावा) यांनी खालच्या फळीत उतरूनही उल्लेखनीय कामगिरी केली. दोघांनी प्रत्येकी एक शतक ठोकले. या दोघांच्या खेळीमुळे चौथा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात भारताला यश मिळाले.
हेही वाचा – IND vs ENG : यशस्वी जैस्वालचा शतकी धमाका! सचिनचा विक्रम मोडत गावस्कर-रोहितच्या यादीत झाला सामील
भारताला मालिका बरोबरीत राखण्याची संधी –
पहिला कसोटी सामना इंग्लंडने पाच विकेट्सने जिंकला, तर दुसऱ्या सामन्यात भारताने ३३६ धावांनी विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात भारताला २२ धावांनी पराभव पत्करावा लागला, तर चौथा सामना अनिर्णित राहिला. आता पाचवा कसोटी सामना जिंकल्यास भारत मालिका २-२ ने बरोबरीत सोडवू शकतो. या मालिकेत यशस्वी जैस्वालच्या शतकाने आणि गिलच्या सातत्यपूर्ण कामगिरीने भारतीय चाहत्यांना आशा बंधली आहे. पाचव्या सामन्याचा निकाल मालिकेच्या अंतिम दिवशी स्पष्ट होईल.





