Rishabh Pant : ‘गार्डन में घूम रहे हैं…’, रोहितबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ऋषभ पंतने पत्रकाराना दिले मजेशीर उत्तर, पाहा VIDEO

Rishabh Pant Hilarious ‘Garden’ Quip : रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये निराशा पसरली आहे. चाहत्यांना त्याचे शब्द आठवतील, जे अनेकदा स्टम्प माइकमध्ये कैद झाले होते विशेषतः विशाखापट्टणम येथील दुसऱ्या कसोटी सामन्यातील “कोणी गार्डनमध्ये फिरताना दिसू नये” हे त्याचे वाक्य खूप गाजले होते. आता रोहित-विराटशिवाय भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. यावेळी ऋषभ पंतला मुंबई विमानतळावर पत्रकारांनी रोहितबद्दल विचारले असता त्याने दिलेले उत्तर ऐकून सर्वांना हसू आले.
ऋषभ पंतने केला विनोद –
एका पत्रकाराने ऋषभ पंतला विचारले, ‘रोहित भाई कुठे आहे?’ यावर पंतने उत्तर दिले, ‘गार्डन में घूम रहे हैं’ त्याचे उत्तर ऐकून सर्वजण हसले. पंतला जेव्हा विचारण्यात आले की त्याला रोहितची आठवण येईल का, तेव्हा त्याने हो असे उत्तर दिले. २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या विशाखापट्टणम कसोटीदरम्यान ३८ वर्षीय रोहित शर्माचे हे वाक्य स्टंप माइकमध्ये कैद झाले होते. मैदानावर पुरेशी ऊर्जा न दाखवल्याबद्दल तो त्याच्या खेळाडूंना फटकारताना असे म्हणाला होता.
We Will Miss Kohli, Rohit & Pant Together In Whites 🥺 #RishabhPant pic.twitter.com/PiA7L9R6pL
— Nani Sai (@NaniSai33) June 6, 2025
‘बाग में घुमने वाले बंदे’ –
pic.twitter.com/Prv1PBjKn0 it is a pant style..#RishabhPant #engvsind #ArrestKohli
— CRIME MASTER GOGO (@crimegogo40) June 6, 2025
इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर रोहित शर्माने इंस्टाग्रामवर एक फोटोही पोस्ट केला होता, ज्यामध्ये त्याने लिहिले होता, ‘बाग में घुमने वाले बंदे’. या फोटोमध्ये रोहित ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि सर्फराझ खानसोबत पोज देताना दिसला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर रोहित आणि विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यांनी इंग्लंड दौऱ्यासाठी संघाची घोषणा होण्यापूर्वीच कसोटी कारकिर्दीला अलविदा म्हटले.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ :
शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.





