IND vs ENG : मोहम्मद सिराजचा कहर! इंग्लंडला गुंडाळत भारताला मिळवून दिली मोठी आघाडी

IND vs ENG Siraj-Aakash Deep dismantle England : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (४ जुलै २०२५) मोहम्मद सिराजने आपल्या भेदक गोलंदाजीने इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले. तिसऱ्या सत्रात मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडला ४०७ धावांत सर्वबाद केले. ज्यामध्ये सिराजने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या. भारताने पहिल्या डावात ५८७ धावा केल्या होत्या, त्यामुळे भारताला १८० धावांची आघाडी मिळाली आहे.
सिराज-आकाशने इंग्लंडला गुंडाळले –
तिसऱ्या दिवसाचा खेळ इंग्लंडने ७७/३ या धावसंख्येपासून सुरू केला, पण सुरुवातीला त्यांना दोन मोठे धक्के बसले. मोहम्मद सिराजने दिवसाच्या दुसऱ्याच षटकात इंग्लंडला सलग दोन धक्के दिले. त्याने प्रथम जो रूट (२२) याला ऋषभ पंतच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सलाही पवेलियनचा रस्ता दाखवला. स्टोक्सला खातेही उघडता आले नाही.
#TeamIndia bowl out England for 407 & secure a 180-run lead! 🙌 🙌
Mohammed Siraj & Akash Deep share the spoils with the ball 👏 👏
Updates ▶️ https://t.co/Oxhg97g4BF#ENGvIND | @mdsirajofficial pic.twitter.com/cocyF2WLIQ
— BCCI (@BCCI) July 4, 2025
यानंतर ८४ धावांवर पाच गडी गमावून संकटात सापडलेल्या इंग्लंडसाठी हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ यांनी संकटमोचकाची भूमिका निभावली. या दोघांमध्ये सहाव्या गड्यासाठी ३६८ चेंडूंमध्ये ३०३ धावांची शानदार भागीदारी झाली. या दरम्यान, जेमी स्मिथने ८० चेंडूंमध्ये आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक पूर्ण केले, तर हॅरी ब्रूकने १३७ चेंडूंमध्ये आपले नववे कसोटी शतक साजरे केले.
हेही वाचा – Hockey Asia Cup 2025 : पाक खेळाडूंना भारतात हॉकी खेळण्याची परवानगी का? आदित्य ठाकरेंचा केंद्रावर हल्लाबोल
ब्रूक-स्मिथने साकारली ३०३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी –
दुसऱ्या सत्राचा खेळ इंग्लंडच्या ३५५/५ धावांवर संपला होता. मात्र, तिसऱ्या सत्रात आकाश दीपने हॅरी ब्रूकला बाद करत जेमी स्मिथसोबतची ३०३ धावांची भागीदारी तोडली. हॅरी ब्रूकने २३४ चेंडूंमध्ये १७ चौकार आणि एका षटकारासह १५८ धावा केल्या. दुसरीकडे, जेमी स्मिथ २०७ चेंडूंमध्ये २१ चौकार आणि चार षटकारांसह १८१ धावा करून नाबाद राहिला.
हेही वाचा – IND vs ENG : सिराजने स्टोक्सला बाद करत रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच गोलंदाज
सिराजने ६ आणि आकाशने ४ विकेट्स घेतल्या –
आकाश दीपने तिसऱ्या सत्रात स्मिथ व्यतिरिक्त क्रिस वोक्सलाही बाद केले. वोक्सला करुण नायरच्या हातून झेलबाद करताना त्याने फक्त पाच धावा केल्या. यानंतर मोहम्मद सिराजने ब्रायडन कार्स, जोश टंग आणि शोएब बशीर यांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. हे तिन्ही फलंदाज खातेही उघडू शकले नाहीत. इंग्लंडच्या पहिल्या डावात भारतासाठी मोहम्मद सिराजने सहा विकेट्स घेतल्या, तर आकाश दीपने चार विकेट्स घेतल्या.





