IND vs ENG : बेन डकेटला पंगा घेणं पडलं महागात, साई सुदर्शनने मागे फिरुन दिलं चोख प्रत्युत्तर, पाहा VIDEO

IND vs ENG Sai Sudarshan-Ben Duckett Clash : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ओव्हल कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एक मोठा वाद झाला. भारताचा युवा फलंदाज साई सुदर्शन आणि इंग्लंडचा खेळाडू बेन डकेट यांच्यात मैदानावर तुफान भांडण झालं. याआधी लॉर्ड्स कसोटीत बेन डकेटने शुबमन गिल शीही वाद घातला होता. आता साई सुदर्शन याच्याशी झालेल्या या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे.
काय आहे प्रकरण?
भारताच्या दुसऱ्या डावातील १८ वे षटक इंग्लंडचा गोलंदाज गस अॅटकिन्सन टाकत होता. त्याच्या षटकातील दुसरा चेंडू साई सुदर्शनला नीट समजला नाही आणि तो एलबीडब्ल्यू आऊट झाला. सुदर्शनने डीआरएस घेतला पण त्याचा काही फायदा झाला नाही. आउट झाल्यावर तो पॅव्हेलियनकडे निघाला असताना बेन डकेटने त्याला काहीतरी बोलून चिथावलं. यामुळे सुदर्शन चिडला आणि त्याने माघारी फिरून डकेटला प्रत्युत्तर दिलं. दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं हे समजलं नाही, पण सुदर्शन याने पॅव्हेलियनकडे जाणारी पावलं मागे फिरवून डकेटला सुनावलं, हे तिथल्या दृश्यांवरून स्पष्ट झालं.
Some Heated words exchange with Ben Ducket and Sai Sudarshan, c’mon Sai perform and then speak.#INDvsENG #Saisudarshan #BenDuckett pic.twitter.com/OifqJhFxeL
— Pawan Mathur (@ImMathur03) August 1, 2025
साई सुदर्शनची मालिकेतील कामगिरी –
या सामन्यात साई सुदर्शन याला फक्त ११ धावा करता आल्या, पण इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेत त्याने ३ सामन्यांच्या ६ डावांमध्ये १८ चौकारांसह एकूण १४० धावा केल्या. यामध्ये त्याचा सर्वोत्तम धावसंख्या ६१ धावां राहिली, तर त्याची सरासरी २३.३३ राहिली. ही साई सुदर्शनची कसोटी पदार्पण मालिका आहे. आतापर्यंत त्याला त्याच्याकडून असलेल्या अपेक्षेनुसार कामगिरी करता आलेली नाही.
हेही वाचा – IND vs ENG : ‘हा आमच्या योजनेचा भाग होता, पण…’, जो रूटसोबतच्या वादाबद्दल प्रसिध कृष्णाचा मोठा खुलासा
डकेटचा गिलसोबतही झाला होता वाद –
याआधी लॉर्ड्स कसोटीमध्येही बेन डकेटने शुबमन गिलशी वाद घातला होता. तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी डकेट आणि त्याचा सहकारी झॅक क्रॉली खेळ मंदावण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा गिलशी त्याचा वाद झाला होता. आता ओव्हल टेस्टमध्ये साई सुदर्शनशी झालेल्या या भांडणाने बेन डकेट पुन्हा चर्चेत आला आहे. या वादामुळे सामन्याला नाट्यमय वळण मिळालं असून, याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.





