IND vs ENG : क्रिकेटच्या पंढरीत सचिन तेंडुलकरचा खास सन्मान: घंटानादासह पोर्ट्रेटचे अनावरण!

IND vs ENG Sachin Tendulkar Honored at Lords : लॉर्ड्सच्या ऐतिहासिक क्रिकेट मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. इंग्लंडने सलग तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, तर भारतीय संघाला गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरावं लागलं. या सामन्यासाठी भारतीय संघात जसप्रीत बुमराहने पुनरागमन केलं आहे. विशेष म्हणजे, या सामन्याची सुरुवात सचिन तेंडुलकरने घंटानाद करून केली. यावेळी सचिनचा खास सन्मान करण्यात आला.
लॉर्डस कसोटीत सचिनने केला घंटानाद –
भारत आणि इंग्लंड यांच्यातील या कसोटी मालिकेला सचिन तेंडुलकर आणि इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्या नावाने ‘अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी’ असं नाव देण्यात आलं आहे. सचिन तेंडुलकर तिसऱ्या कसोटीसाठी लॉर्ड्सच्या मैदानावर उपस्थित होते आणि त्यांनी सामना सुरू होण्यापूर्वी घंटानाद केला. सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले आहेत. त्याच्या या यशस्वी कारकिर्दीचा सन्मान आजही त्याला मिळत आहे.
घंटानाद करण्याचा मान आहे खास –
📍 Lord’s Cricket Ground
📸 The legendary Sachin Tendulkar rings the bell ahead of the start of the opening day of the 3rd Test 👌👌#TeamIndia | #ENGvIND | @sachin_rt pic.twitter.com/HnWyEa4Up8
— BCCI (@BCCI) July 10, 2025
लॉर्ड्स क्रिकेट मैदान, ज्याला क्रिकेटची पंढरी म्हणतात. येथे आतापर्यंत सर्वाधिक १४५ कसोटी सामने खेळले गेले आहेत. लॉर्ड्सच्या पॅव्हेलियनजवळ एक घंटा आहे, गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेनुसार, प्रत्येक कसोटी सामन्याच्या सुरुवातीला एखादी खास व्यक्ती ही घंटा वाजवते. हा घंटानाद म्हणजे सामन्याची अधिकृत सुरुवात आणि मोठा सन्मान मानला जातो.
हेही वाचा – IND vs ENG : लॉर्ड्स कसोटीत स्टोक्सचा फलंदाजीचा निर्णय! दोन्ही संघांत प्रत्येकी एक बदल, पाहा प्लेइंग इलेव्हन
सचिनच्या पोर्ट्रेटचे म्युझियममध्ये अनावरण –
A legendary frame 🖼️
📸📸 Snapshots from portrait unveiling of the legendary Sachin Tendulkar at the Lord’s Museum 👌👌#TeamIndia | @sachin_rt pic.twitter.com/5KtnfvNEpf
— BCCI (@BCCI) July 10, 2025
आता लॉर्ड्स येथे सुरू झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वीही सचिन तेंडुलकरचा खास सन्मान करण्यात आला. सामना सुरू होण्यापूर्वी सचिन तेंडुलकरने स्वत: घंटा वाजवली. याशिवाय त्याला आणखी विशेष सन्मान देण्यात आला आहे. लॉर्ड्स म्युझियममध्ये त्याला विशेष सन्मान मिळाला आहे. त्याच्या नवीन पोर्ट्रेटचे म्युझियममध्ये अनावरण करण्यात आले. बीसीसीआयने स्वतः सचिनच्या पोर्ट्रेट अनावरणाच्या काही फोटो शेअर केली आहेत.
हेही वाचा – Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविचने रचला इतिहास, सेमीफायनलमध्ये पोहोचत मोडला फेडररचा विक्रम
लॉर्डस कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन:
भारत : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
इंग्लंड : झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, शोएब बशीर





