I only believe in Siraj bhai : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात पार पडलेल्या ५ व्या कसोटी सामन्यात भारताने ६ धावांनी इंग्लंडवर विजय मिळवला. हा सामना शेवटच्या दिवसापर्यंत चालला होता. एकवेळ इंग्लड हा सामना जिंकेल असे वाटत असताना अचानक टीम इंडियाने (IND vs ENG) कमबॅक करत हा सामना ६ धावांनी जिंकला. या सामन्यात टीम इंडियाचा बॉलर मोहम्मद सिराज याने अप्रतिम कामगिरी करून हा सामना जिंकावण्यात मोलाची भूमिका बजावली. या सामन्यानंतर, गुगल इंडियाने मोहम्मद सिराजसाठी एक अनोखी पोस्ट करत त्याला मानवंदना दिली आहे. Congratulations Team India 🏏✨ pic.twitter.com/HuHL8RdtuY — Google India (@GoogleIndia) August 4, 2025 गूगलने काय लिहिले पोस्टमध्ये ? यामध्ये गुगलच्या सर्च बारमध्ये ‘I only believe…’ असे टाइप केले असता, ‘I only believe in Siraj bhai’ अशी सूचना दिसत होती. सिराजच्या या कामगिरीनंतर अनेक चाहत्यांनी ही पोस्ट लगेचच उचलून धरली आणि ती वेगाने व्हायरल झाली. मोहम्मद सिराजने गुगलवर believe सर्च करून डीपी ठेवल्याचं त्याने प्रेस कॉन्फरेन्समध्ये म्हटलं होतं. त्यानंतर आता गुगलने देखील सिराजला मानवंदना दिली आहे. सिराज ठरला विजयाचा शिल्पकार ओव्हलच्या मैदानावर इंग्लंडचा संघ जेव्हा विजयाच्या दिशेने वाटचाल करत होता, तेव्हा प्रत्येक वेळी सिराजने महत्त्वाची विकेट घेऊन भारताला सामन्यात परत आणले. विशेष म्हणजे, भारताने इंग्लंडमध्ये सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिका बरोबरीत राखली. या विजयाचा खरा शिल्पकार मोहम्मद सिराज ठरला.