IND vs ENG : सिराजची एक चूक अन् भारताची विजयाची आशा धोक्यात! नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
IND vs ENG Mohammed Siraj make big mistake : इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडने दुसऱ्या डावात 374 धावांचा पाठलाग करताना लंच ब्रेकपर्यंत 3 बाद 164 धावा केल्या आहेत. सध्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर असलेल्या इंग्लंडला विजयासाठी 210 धावांची गरज आहे, तर भारताला विजयासाठी 7 गडी हवे आहेत. लंचच्या वेळी जो रूट 23 आणि हॅरी ब्रूक 38 धावांवर नाबाद होते. यादरम्यान मोहम्मद सिराजने एक चूक अशी केली, जी संघाला चांगलीच महागात पडू शकते, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
मोहम्मद सिराजने केली मोठी चूक –
दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने बेन डकेट (54) आणि ओली पोप (27) यांचे महत्त्वाचे गडी बाद केले. मात्र, इंग्लंडच्या फलंदाजांनी आक्रमक खेळ करत भारतीय गोलंदाजांवर दबाव टाकला. या सत्रात इंग्लंडने 114 धावा जोडल्या, तर भारताला दोन विकेट्स मिळाल्या. दरम्यान, हॅरी ब्रूकला जीवदान मिळाले जेव्हा प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर मोहम्मद सिराजने पकडलेला झेल घेऊनही विकेट मिळाली नाही, कारण सिराजच्या पायाचा सीमारेषेला स्पर्श झाला.
Prasidh Krishna was all of us, watching it unfold 😥 #SonySportsNetwork #ENGvIND #NayaIndia #DhaakadIndia #TeamIndia #ExtraaaInnings pic.twitter.com/jB138cMO13
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 3, 2025
हॅरी ब्रूकला मिळाले जीवदान –
इंग्लंडच्या डावातील 35व्या षटकात प्रसिध कृष्णा गोलंदाजी करत होता. हॅरी ब्रूकने त्याच्या पहिल्या चेंडूवर पुल शॉट खेळला, पण चेंडूला टॉप एज लागला आणि तो सीमारेषेकडे गेला. सिराजने उत्तम झेल पकडला, पण झेल पकडल्यानंतर त्याचा पाय सीमारेषेला लागला. यामुळे ब्रूक बाद होण्यापासून वाचला. सिराजच्या या चुकीमुळे प्रसिद्ध कृष्णा निराश झाला. हॅरी ब्रूकची विकेट भारतासाठी महत्त्वाची होती, कारण त्याची आक्रमक फलंदाजी भारतासाठी धोकादायक ठरू शकते.
हेही वाचा – WCL 2025 : डब्ल्यूसीएलच्या मालकाचं लाईव्ह शोमध्ये अँकरला प्रपोजल, VIDEO होतोय व्हायरल
सामन्याबद्दल बोलायचे, तर ओव्हल कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. भारताने पहिल्या डावात 224 धावा केल्या, तर इंग्लंड 247 धावांवर सर्वबाद झाला. भारताने दुसऱ्या डावात 396 धावा करत इंग्लंडसमोर 374 धावांचे आव्हान ठेवले. आता सामन्याचा निकाल इंग्लंडच्या फलंदाजी आणि भारताच्या गोलंदाजीवर अवलंबून आहे.





