IND vs ENG : मियां भाईच्या मॅजिकची कमाल! सलग दोन चेंडूंवर रुट-स्टोक्सला दाखवला तंबूचा रस्ता, पाहा VIDEO

IND vs ENG 2nd Test Updates : एजबॅस्टनच्या मैदानावर ‘मियां भाई’ची जादू पाहायला मिळत आहे. मोहम्मद सिराजच्या हवेत स्विंग होणाऱ्या चेंडूंनी इंग्लंडच्या फलंदाजांची डोकेदुखी वाढवली आहे. कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच सिराजने इंग्लंडच्या संघाला पूर्णपणे बॅकफूटवर ढकलले. अवघ्या दोन चेंडूंमध्येच सिराजने इंग्लंडच्या फलंदाजी फळीची कंबर मोडली. भारतीय वेगवान गोलंदाजाने दिवसाच्या पहिल्याच षटकात दोन मोठे धक्के दिले. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सिराजने पहिल्यांदा धोकादायक फलंदाज जो रूटला ऋषभ पंतच्या हातून झेलबाद करत तंबूकडे परत पाठवले. त्यानंतरच्या पुढच्याच चेंडूवर सिराजने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सलाही आपल्या वेगाने पूर्णपणे चकित केले. मालिकेच्या पहिल्या कसोटीत लय हरवलेला दिसणारा सिराज पुन्हा लयीत परतल्याने भारतीय संघासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे.
मोहम्मद सिराजचा कहर –
WHAT A START! 😍#MohammedSiraj strikes in his very first over of the day, getting the big wicket of #JoeRoot, and needless to say, 𝐲𝐞𝐡 𝐬𝐞𝐞𝐤𝐡𝐧𝐞 𝐧𝐚𝐡𝐢, 𝐬𝐞𝐞𝐤𝐡𝐚𝐧𝐞 𝐚𝐚𝐲𝐞 𝐡𝐚𝐢! 🏏🔥
How crucial could this breakthrough be in shaping the innings? 🤔#ENGvIND… pic.twitter.com/VReeydN59s
— Star Sports (@StarSportsIndia) July 4, 2025
कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात होते. जो रूट आणि हॅरी ब्रूक यांची जोडी दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात चांगल्या लयीत दिसत होती. रूटला नेहमीच कसोटीत भारतीय संघासाठी मोठा धोका मानला जातो. मात्र, सिराजने दुसऱ्या षटकातच हा धोका दूर केला. सिराजच्या हातून सुटलेल्या चेंडूने रूटच्या बॅटचा किनारा घेतला आणि तो ऋषभ पंतच्या हातात सामावला.
हेही वाचा – Wimbledon 2025 : जोकोविचचा धमाकेदार विजय, फेडररचा विक्रम मोडत रचला इतिहास
जो रूटला नको असतानाही केवळ २२ धावा काढून माघारी परतावं लागलं. रूटला बाद केल्यानंतर लगेच पुढच्याच चेंडूवर मोहम्मद सिराजने आपल्या वेगवान गोलंदाजीने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सलाही चकित केलं. जास्त उंच उसळी घेणाऱ्या चेंडूने स्टोक्सला पूर्णपणे गोंधळात टाकलं आणि बाकी काम रिषभ पंतने यष्ट्यांमागे पूर्ण केलं. स्टोक्स खातं न उघडताच माघारी परतला.
हेही वाचा – Grand Chess Tour : डी. गुकेशचा मास्टरस्ट्रोक! कार्लसनला कमजोर समजण्याची चूक पडली महागात
केवळ दुसऱ्यांदा घडलं असं –
Siraj starts off Day 3 with a bang 💥#SonySportsNetwork #GroundTumharaJeetHamari #ENGvIND #NayaIndia #DhaakadIndia #TeamIndia #ExtraaaInnings pic.twitter.com/uGKsQn0bKy
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 4, 2025
कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या घरच्या मैदानावर खेळताना इंग्लंडच्या पहिल्या सहा फलंदाजांपैकी तीन जण शून्यावर बाद होण्याची ही केवळ दुसरी वेळ आहे. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी बेन डकेटला आकाशदीपने शून्यावर बाद केलं होतं. तसेच, ऑली पोपलाही आकाशदीपने खातं न उघडता माघारी पाठवलं होतं. कसोटीच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात टीम इंडियासाठी शानदार झाली. बातमी लिहेपर्यंत इंग्लंडची अर्धी टीम माघारी परतली आहे. इंग्लंड संघाने ३५ षटकानंतर ५ बाद १७५ धावा केल्या आहेत. सध्या हॅरी ब्रूक ६१ आणि जेमी स्मिथ ५९ धावांवर खेळत आहेत.





