IND vs ENG कसोटीत नवा ट्विस्ट, रूट-प्रसिध भिडले! नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

IND vs ENG Joe Root and Prasidh Krishna’s Heated Clash : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील अंतिम सामना आता रंगतदार वळणावर पोहोचला आहे. या मालिकेत दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये अनेकदा खटके उडाले. असाच काहीसा प्रकार पाचव्या कसोटी सामन्यातही पाहायला मिळाला. इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट आणि भारतीय वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा यांच्यात मैदानावर तीव्र शाब्दिक चकमक झाली. ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
रूट-प्रसिद्ध यांच्यात का झाला वादा?
इंग्लंडच्या डावातील 22व्या षटकात जो रूट आणि प्रसिध यांच्यात काहीतरी बाचाबाची झाली. प्रसिधने रूटला नेमके काय म्हटले हे स्पष्ट झाले नाही, पण हा वाद इतका वाढला की अंपायरांना मध्यस्थी करावी लागली. रूट, जो आपल्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो, यावेळी मात्र चांगलाच संतापला. या छोट्याशा बाचाबाने आधीच उत्कंठावर्धक असलेल्या सामन्यात आणखी एक रंग भरला.
Tensions flare at the Oval! ⚡
A heated exchange erupts between Joe Root and Prasidh Krishna on the field — tempers boiling in the middle! 🔥#ENGvsIND #JoeRoot #PrasidhKrishna pic.twitter.com/2NgYcnY9y4— Anis Sajan (@mrcricketuae) August 1, 2025
केएल राहुलने केली अंपायरांशी चर्चा –
What did prasidh do cause I can’t remember the last time I saw Root this pissed 😭 pic.twitter.com/jWQxnRHkWc
— garvi. (@kohlichronicles) August 1, 2025
जो रूट खूपच संतापलेला दिसत होता. त्याने क्रीजवर परतण्यापूर्वी प्रसिधला काहीतरी सुनावले. याचवेळी अंपायरांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, भारतीय संघाचा ज्येष्ठ फलंदाज केएल राहुल अंपायरांशी काहीतरी बोलताना दिसला. हा वाद फार काळ टिकला नाही आणि खेळाडू आपापल्या जागी परतले.
हेही वाचा – Duleep Trophy 2025 : वेस्ट झोनच्या कर्णधारपदी शार्दुल ठाकूरची वर्णी! रहाणे-पुजाराला मिळाले नाही स्थान
इंग्लंडचे आक्रमक प्रदर्शन –
पहिल्या सत्रात इंग्लंडने भारताचा डाव अवघ्या 224 धावांत गुंडाळला आणि दुपारच्या जेवणापर्यंत 109/1 अशी मजबूत सुरुवात केली. झॅक क्रॉलीने 52 धावांची वेगवान खेळी केली, तर बेन डकेटने 43 धावांची साथ दिली. भारतीय गोलंदाजांना धावा रोखण्यासाठी संघर्ष करावा लागला आणि त्यांची गोलंदाजी अनेकदा चुकीची ठरली. दुपारच्या जेवणानंतर भारताने पुनरागमन केले. प्रसिध कृष्णाने क्रॉलीला 64 धावांवर रवींद्र जडेजाच्या हाती झेलबाद केले, तर मोहम्मद सिराजने ऑली पोपला बाद केले.





