IND vs ENG : सॅमसनची पुन्हा एकदा क्लास इनिंग अन् इंग्लंडचा खेळ खल्लास! भारताने ऐतिहासिक विजयासह पटकावलं फायनलचं तिकीट
IND vs ENG : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या दुसऱ्या रोमांचक सेमीफायनल सामन्यात भारताने इंग्लंडवर ७ धावांनी मात करत फायनलमध्ये धडक मारली आहे.

IND vs ENG India reaches Final after beats England: आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या दुसऱ्या रोमांचक सेमीफायनल सामन्यात भारताने इंग्लंडवर ७ धावांनी मात करत सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक मारली आहे. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारताने संजू सॅमसनच्या (८९) वादळी खेळीच्या जोरावर २५३ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ जेकब बेथलच्या झुंजार शतकाच्या जोरावर २४६ धावांपर्यंत मजल मारु शकला, ज्यामुळे भारतीय संघाने ऐतिहासिक विजयाची नोंद केली.
भारताने १४ वर्षानंतर रचला नवीन इतिहास –
संजू सॅमसनची स्फोटक फलंदाजी, बुमराह-हार्दिकने मोक्याच्या क्षणी केलेली शानदार गोलंदाजी आणि अक्षर पटेलने केलेले उत्तम क्षेत्ररक्षण यामुळे भारताने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. यासह भारतीय संघाने नवीन इतिहास रचला आहे. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत केवळ एकदाच असे घडले होते की, यजमान देशाने अंतिम फेरी गाठली होती. २०१२ मध्ये श्रीलंकेने यजमान म्हणून खेळताना फायनलपर्यंत मजल मारली होती. यानंतर आता यजमान म्हणून फायनल गाठणारा भारत हा जगातील केवळ दुसरा देश ठरला आहे. जर भारताने न्यूझीलंडविरुद्धची फायनल जिंकली, तर यजमान देश म्हणून ट्रॉफी जिंकणारा भारत पहिला देश ठरेल.
Marching towards the #Final 👏
A step away from 𝙂𝙡𝙤𝙧𝙮 🏆#TeamIndia is into the #T20WorldCup finale 🥳Scorecard ▶️ https://t.co/LxSBs3EDPx#MenInBlue | #ENGvIND pic.twitter.com/6BBNkNw2aB
— BCCI (@BCCI) March 5, 2026
सॅमसनचे वादळ आणि २५३ धावांचा डोंगर –
Innings Break!#TeamIndia register the highest team total in ICC Men’s T20 World Cup knockouts 🔥👏
Over to the bowlers to defend this 🙌
Scorecard ▶️ https://t.co/LxSBs3EDPx#T20WorldCup | #MenInBlue | #ENGvIND pic.twitter.com/IKEpHNKHJT
— BCCI (@BCCI) March 5, 2026
या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात संमिश्र राहिली. अभिषेक शर्मा स्वस्तात बाद झाला, मात्र संजू सॅमसनने मैदानाचा ताबा घेतला. मात्र, सॅमसन १५ धावांवर कर्णधार हॅरी ब्रूकने त्याचा झेल सोडला. हा सुटलेला झेल केवळ एक विकेट नव्हती, तर सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर सॅमसनने अवघ्या ४२ चेंडूंत ७ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ८९ धावांची झंझावाती खेळी केली. ज्यामध्ये शिवम दुबेनेही ४३ धावा करुन उत्तम साथ दिली. इतर फलंदाजांनीही मोलाची साथ दिल्याने भारताने निर्धारित २० षटकांत २५३ धावांची विक्रमी धावसंख्या उभारली. इंग्लंडकडून आदिल रशीद आणि विल जॅक्सने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर जोफ्रा आर्चरने एक विकेट्स घेतली.
जेकब बेथेलची शतकी खेळी ठरली व्यर्थ –
22 years Jacob bethell deserves a standing ovation. What an inning.
You played like a warrior.
#INDvsENG pic.twitter.com/jNCV0jDupR— सुमित उपाध्याय (@sumitupadhyay__) March 5, 2026
२५४ धावांच्या अवाढव्य लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडनेही जोरदार प्रत्त्युत्तर दिले. जोस बटलर आणि इतर फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवला. एका क्षणी सामना इंग्लंडच्या बाजूने झुकतोय असे वाटत असतानाच, भारताने टिच्चून गोलंदाजी केली. विशेषतः अक्षर पटेलने घेतलेला हॅरी ब्रूकचा तो अविश्वसनीय झेल सामन्याचा दुसरा टर्निंग पॉईंट ठरला. इंग्लंडने सुरुवातीच्या षटकांमध्ये महत्त्वाच्या विकेट गमावल्यानंतर, २२ वर्षीय जेकब बेथेलने एकट्याने भारतीय छावणीला हादरवून टाकले. बेथेलने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत अवघ्या ४८ चेंडूत अविश्वसनीय १०५ धावा केल्या. बेथेलने जवळजवळ २१८ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याच्या खेळीत ८ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. टी-२० विश्वचषकाच्या नॉकआउट इतिहासात खेळलेला ही सर्वोच्च खेळी ठरली.
हार्दिक-बुमराहने केला टिच्चून मारा-
A crucial breakthrough 👊
Hardik Pandya gets his second wicket of the night! 💙
Updates ▶️ https://t.co/LxSBs3EDPx#TeamIndia | #T20WorldCup | #MenInBlue | #ENGvIND pic.twitter.com/0ro26c5XU8
— BCCI (@BCCI) March 5, 2026
शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात इंग्लंडला विजयासाठी मोठ्या धावांची गरज होती, मात्र भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्पा राखत इंग्लंडला २४६ धावांवर रोखले. ७ धावांनी मिळालेला हा विजय भारताला विजेतेपदाच्या आणखी एक पाऊल जवळ घेऊन गेला आहे. भारताकडून हार्दिक पंड्या सर्वात यशस्वी गोलंदाज होता, त्याने ४ षटकांत ३८ धावा देत २ विकेट्स घेतल्या. त्याला जसप्रीत बुमराहसह इतर गोलंदाजी उत्तम साथ दिली आणि प्रत्येकी एक विकेट्स घेतली. या सामन्यात भारताने पाच गोलंदाजांचा वापर केला. आता भारतीय संघ आपल्या तिसऱ्या टी-२० विश्वचषक ट्रॉफीपासून एक पाऊल दूर आहे. भारत आणि न्यूझीलंड संघात ८ मार्चला नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे जेतेपदासाठी लढत होणार आहे.





