IND vs ENG : इंग्लंड संघाला मोठा धक्का! बेन स्टोक्स पाचव्या कसोटीतून बाहेर, पाहा प्लेइंग इलेव्हन

IND vs ENG England announces playing XI : इंग्लंडने भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यासाठी आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. या संघाचा कर्णधार बेन स्टोक्स खांद्याच्या दुखापतीमुळे ओव्हल येथे होणाऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर आहे. त्याच्या जागी ऑली पोप संघाचे नेतृत्व करेल. इंग्लंडच्या निवड समितीने भारताविरुद्ध ओव्हल येथे होणाऱ्या मालिकेतील अंतिम कसोटी सामन्यापूर्वी प्लेइंग इलेव्हनमध्ये चार बदल केले आहेत.
बेन स्टोक्सह संघात चार बदल –
कर्णधार बेन स्टोक्स उजव्या खांद्याच्या दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. बेन स्टोक्सने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने ४ सामन्यांत ३०४ धावा केल्या, यामध्ये मँचेस्टर येथे शतकाचाही समावेश आहे. आतापर्यंत स्टोक्स इंग्लंडसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे, त्याने ४ सामन्यांत १७ विकेट्स घेतले हेत. फिरकीपटू लियाम डॉसन आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि ब्रायडन कार्स हे देखील संघात नाहीत.
Ben Stokes will miss out on the final Test of the series with a right shoulder injury ❌
And we’ve made four changes to our side 👇
— England Cricket (@englandcricket) July 30, 2025
चौथ्या दिवशी स्टोक्सने एकही षटक टाकले नव्हते, पण अंतिम दिवशी त्याने स्वतः इंग्लंडसाठी गोलंदाजीची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. स्टोक्सने एकूण ११ षटके टाकली आणि ३३ धावा देत के. एल. राहुलचा गडी बाद केला. भारताने हा सामना वाचवला आणि इंग्लंडला मॅनचेस्टरमध्ये मालिका जिंकता आली नाही. आता स्टोक्सच्या अनुपस्थितीत इंग्लंडपुढे घरी मालिका जिंकण्याचे आव्हान आहे.
हेही वाचा – Gautam Gambhir : भारतीय संघाची कामगिरी अभिमानास्पद; प्रशिक्षक गौतम गंभीरने केले कौतुक
पाचव्या सामन्यात दिसणार चुरस –
भारताने ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्याला बरोबरीत सोडवून पाच सामन्यांच्या मालिकेत चुरस कायम ठेवली आहे. आता पाचव्या सामन्यात भारताचा उद्देश मालिका बरोबरीत करण्याचा असेल. दुसरीकडे, इंग्लंडच्या संघाला ३-१ अशा फरकाने मालिका जिंकण्याची संधी आहे. मँचेस्टरमध्ये भारताने पराभवाच्या उंबरठ्यावर असताना शानदार पुनरागमन करत सामना बरोबरीत सोडवला, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल.
पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन:
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), ख्रिस वोक्स, गस अॅटकिन्सन, जेमी ओव्हरटन, जोश टंग





