IND vs ENG : जडेजा-सुंदरच्या शतकांमुळे स्टोक्स अस्वस्थ, हस्तांदोलन करताना गिलकडे केले दुर्लक्ष

IND vs ENG Manchester Test Handshake Controversy : मँचेस्टर येथील चौथ्या कसोटीत भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत इंग्लंडविरुद्धचा सामना ड्रॉ केला. या सामन्यात जडेजा-सुंदरने शतकं झळकावून महत्त्वाची भूमिका बजावली. या चौथ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी बेन स्टोक्स काही जास्तच अस्वस्थ दिसला. तो वारंवार जडेजा-सुंदरचे शतक पूर्ण होण्यापूर्वी सामना ड्रॉ घोषित प्रयत्न करत होता. मात्र, भारताच्या दोन्ही फलंदाजांनी त्याला भाव दिला नाही, यानंतर सामना संपल्यावर स्टोक्सने त्या दोघांशी हस्तांदोलन केले नाही. पण गिलशी हस्तांदोलन केले, मात्र, त्याच्याकडे पाहणे टाळले.
बेन स्टोक्स सामन्याच्या शेवटच्या तासापूर्वी भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि वॉशिंगटन सुंदर यांच्याशी हस्तांदोलन करून ड्रॉवर सहमती दर्शवण्याच्या मनस्थितीत होता, पण दोघांनीही नकार दिला. जडेजा आणि सुंदर तेव्हा शतकाच्या जवळ होते. स्टोक्सच्या या घाईगडबडीमुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले आणि त्याच्यावर खूप टीका होत आहे. सामन्यानंतरही वातावरण काहीसे विचित्र होते. बेन स्टोक्सने शुबमन गिलशी हस्तांदोलन करत होता, पण त्याचे लक्ष दुसरीकडेच होते.
भारतीय संघाने केला जागतिक विक्रम –
THE DRAW DRAMA BETWEEN ENGLAND, JADEJA AND SUNDAR. 🔥#INDvsENG #Jadeja #INDvsENGTest #INDvENG #BenStokes pic.twitter.com/qZ1pIfdt2F
— 🇮🇳 PREM KUMAR YADAV 🇮🇳 (@Indian_6789) July 28, 2025
सामन्यात भारतीय संघाने एक जागतिक विक्रम आपल्या नावावर केला. भारताने एकाच कसोटी मालिकेत सात वेळा ३५० पेक्षा जास्त धावा केल्या, हा एक नवा विक्रम आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने १९२०-२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध आपल्या देशात आणि १९४८ तसेच १९८९ मध्ये परदेशात प्रत्येकी सहा वेळा ३५०+ धावा केल्या होत्या.
भारताने या मालिकेत लीड्स येथील पहिल्या सामन्यात ४७१ आणि ३६४ धावा, एजबॅस्टन येथे ५८७ आणि ४२७/६ (डिक्लेअर), तिसऱ्या कसोटीत ३८७ आणि १७०, तर मँचेस्टर येथील चौथ्या कसोटीत ३५८ आणि ४२५/४ धावा केल्या. आता ३१ जुलैपासून लंडन येथे पाचवी आणि शेवटची कसोटी खेळवली जाईल, ज्यात भारताला मालिका ड्रॉ करण्याची संधी आहे.





