IND vs ENG : भारतीय क्रिकेटमध्ये कधीही न घडलेलं ‘ते’ ९३ वर्षांनी मँचेस्टरमध्ये घडलं, नक्की काय झालं?

IND vs ENG India Plays A Test Match With 5 Left Handed Batter In XI : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथमच पाच डावखुऱ्या फलंदाजांसह मैदानात उतरण्याचा पराक्रम केला आहे. भारतीय क्रिकेटच्या 93 वर्षांच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडली आहे.
93 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं –
23 जुलैपासून मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे पाच डावखुरे फलंदाज भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग आहेत.यापूर्वी भारताने चार डावखुऱ्या फलंदाजांसह संघ उतरवला होता, परंतु पाच डावखुऱ्या फलंदाजांसह संघ मैदानात उतरवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
In their 93-year-old Test history this is the first instance where India have 5 left-handed batters in their XI – Yashasvi Jaiswal, Sai Sudharsan, Rishabh Pant, Ravindra Jadeja and Washington Sundar
— Sarang Bhalerao (@bhaleraosarang) July 23, 2025
भारतीय संघाने 592 कसोटी सामन्यांनंतर हा विक्रम नोंदवला आहे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत. गेल्या दोन सामन्यांमध्ये बाकावर बसलेले साई सुदर्शन आणि शार्दूल ठाकुरचे संघात पुनरागमन झाले आहे.
मँचेस्टर कसोटीतील भारताची प्लेइंग इलेव्हन –
Here’s #TeamIndia‘s Playing XI for the Fourth Test 🙌
Anshul Kamboj makes his Debut 👏👏
Updates ▶️ https://t.co/L1EVgGu4SI#ENGvIND pic.twitter.com/bR2QO2eT8H
— BCCI (@BCCI) July 23, 2025
सुदर्शनने करुण नायर याच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे, तर शार्दूल ठाकुरला नितीश कुमार रेड्डीच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे. नितीश कुमार रेड्डी 21 जुलै रोजी गुडघ्याच्या दुखापतीमुळे गेल्या दोन सामन्यांपासून बाहेर होता. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 38 षटकानंतर 1 बाद 115 धावा केल्या आहेत. केएल राहुल ४६ धावांचे योगदान देऊन तंबूत परतला आहे. सध्या यशस्वी जैस्वाल 55 आणि साई सुदर्शन 11 धावांवर खेळत आहेत.
हेही वाचा – IND vs ENG : ख्रिस वोक्सच्या घातक चेंडूने जैस्वालच्या बॅटचे केले दोन तुकडे, पाहा VIDEO
चौथ्या कसोटीसाठी भारताची प्लेइंग इलेव्हन:
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, अंशुल कंबोज, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज





