IND vs ENG : बुमराहला विश्रांती दिल्याने शास्त्री संतापले; म्हणाले, ‘प्लेइंग इलेव्हनबद्दल फक्त कोच आणि कर्णधारानेच…’

IND vs ENG Ravi Shastri Criticizes : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. भारतीय संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन मोठे बदल केले आहेत. वर्कलोड मॅनेजमेंटसाठी जसप्रीत बुमराहला या कसोटी सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. बुमराहच्या जागी आकाशदीपला संधी देण्यात आली आहे. मात्र, या निर्णयामुळे भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री खूप नाराज आहेत.
मला आश्चर्य वाटतंय की बुमराह हा सामना खेळत नाहीये – रवी शास्त्री
रवी शास्त्री यांचे म्हणणे आहे की, हा सामना मालिकेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता आणि बुमराहने या सामन्यात खेळायला हवे होते. स्काय स्पोर्ट्सशी बोलताना रवी शास्त्री म्हणाले, “मी या निर्णयामुळे पूर्णपणे आश्चर्यचकित आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. बुमराहला नुकतीच एका आठवड्याची विश्रांती मिळाली होती. मला आश्चर्य वाटतंय की बुमराह हा सामना खेळत नाहीये. माझ्या मते, हा निर्णय खेळाडूच्या हातातून काढून घ्यायला हवा.”
प्लेइंग इलेव्हनबद्दल कर्णधार-प्रशिक्षकांनी ठरवावं –
Ravi Shastri slammed India’s decision to rest Jasprit Bumrah for the all-important Edgbaston Test.#ENGvIND #JaspritBumrah #TeamIndia pic.twitter.com/1238jwKpDy
— Circle of Cricket (@circleofcricket) July 2, 2025
रवी शास्त्री पुढे म्हणाले, “प्लेइंग इलेव्हनमध्ये अकरा खेळाडू कोण असतील, हे कर्णधार आणि प्रशिक्षकांनी ठरवायला हवं. मालिकेच्या दृष्टीने हा सामना खूप महत्त्वाचा होता. बुमराहने हा सामना कोणत्याही परिस्थितीत खेळायला हवा होता. लॉर्ड्स कसोटी सामना नंतर आहे. हा एक महत्त्वाचा सामना आहे, जिथे तुम्हाला प्रत्युत्तर देणारी कामगिरी करायची आहे.”
हेही वाचा – Wimbledon 2025 : जोकोविचची पोटदुखीवर मात करत विजयी सलामी! झ्वेरेव-गॉफचा धक्कादायक पराभव
टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल –
टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत. जसप्रीत बुमराहला दुसऱ्या कसोटीत त्याच्या वर्कलोड मॅनेज करण्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. बुमराहच्या जागी आकाशदीपला संधी देण्यात आली आहे. त्याच वेळी, शार्दुल ठाकूरला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे आणि संघ व्यवस्थापनाने त्याच्या जागी नितीश कुमार रेड्डीवर विश्वास दाखवला आहे. त्याच वेळी, साई सुदर्शनला वगळून वॉशिंग्टन सुंदरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.
हेही वाचा – IND vs ENG : जैस्वालचा स्टोक्सला टोला; शतक हुकलं, पण चर्चा तुफान
सामन्याबद्दल बोलायचे तर भारतीय संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवशी ७६ षटकानंतर ५ बाद २७० केल्या आहेत. शुबमन गिल १८१ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने ८६ धावांवर खेळत आहे. त्याचबरोबर रवींद्र जडेजा ४७ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने ३० धावांवर खेळत आहे. या दोघांनी सहाव्या विकेट्ससाठी नाबाद ६० धावांची भागीदारी साकारली आहे. तत्पूर्वी जैस्वालने १०७ चेंडूचा सामना करताना१३ चौकारांसह ८७ धावांची खेळी साकारली.





