ओरिसाच्या कटकमधील बाराबती स्टेडिअममध्ये भारत आणि इंग्लड यांच्यातील दुसरा वनडे सामना खेळवला जात आहे. या सामन्याचा इंग्लंडने जिंकून प्रथम फलंदाजीची निर्णय घेतला. या सामन्यात इंगलंडने प्रथम फलंदाजी करत टीम इंडियासमोर ३०५ धावांचे तागडे आव्हान ठेवले आहे. भारताने या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल केला आहे. विराट कोहलीची दुसऱ्या वनडेत वापसी झाली तर मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याने आजच्या सामन्यातून टीम इंडियामध्ये डेब्यू केले. इंग्लंडने 49.5 षटकात 10 गडी गमवून 304 धावा केल्या आणि विजयासाठी 305 धावांचं आव्हान दिलं आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडकडून बेन डकेट आणि जो रूट यांची बॅट तळपली. दोघांनी अर्धशतकी खेळी करून इंग्लंडला सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली. बेन डकेटन 56 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 65 धावा केल्या. तर जो रूटने 72 चेंडूत 69 धावांची खेळी केली. टीम इंडियाच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर रविंद्र जडेजाची फिरकी चांगलीच चालली. त्याने बेन डकेट आणि जो रूट या दोन महत्त्वाच्या विकेट काढल्या. रविंद्र जडेजाने 10 षटकात 35 धावा देत तीन गडी बाद केले. यात त्याने षटक निर्धाव टाकलं. तसेच वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, मोहम्मद शामी, आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. या सामन्यात विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्माकडून फार अपेक्षा आहेत. हे दोन्ही खेळाडू सध्या फॉर्म गमवून बसले आहेत. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी या दोघांकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. जर यांना इंग्लड विरुद्धच्या सामन्यात फॉर्म गवसला नाही तर टीम इंडियासाठी ही चिंतेची बाब असणार आहे. दोन्ही संघांची प्लेइंग 11 भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती. इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप साल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, गस अॅटकिन्सन, आदिल रशीद, मार्क वूड, साकिब महमूद.