IND vs BAN Test Series : बांगलादेशच्या राणाला प्रत्युत्तर देण्यासाठी टीम इंडियात स्पेशल गोलंदाजाची एन्ट्री, प्रशिक्षक गंभीरने बनवला खास प्लान…

IND vs BAN Test Series :- भारतीय फलंदाज बऱ्याच अंतरानंतर कसोटी लढत खेळणार असल्याने, त्याचा बांगलादेश मालिकेपूर्वी चांगला सराव व्हावा, या उद्देश्याने वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजांकडून फलंदाजांचा सराव करून घेण्यात येत आहे. यासाठी वेगवेगळ्या युवा गोलंदाजांना पाचारण करण्यात आले आहे. संघनिवड करताना देखील या गोष्टींचा फायदा होणार आहे.
रावळपिंडी येथे नुकत्याच झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात पाच बळी घेणारा बांगलादेशचा वेगवान गोलंदाज नाहिद राणा त्याच्या वेगवान गोलंदाजीमुळे चर्चेत आला आहे. राणाच्या गोलंदाजीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या सहा फूट पाच इंच उंचीमुळे त्याला बाऊन्स मिळतो. नाहिद राणाने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत सरळ रेषेत गोलंदाजी करताना फलंदाजांना अडचणीत आणले होते. अशा नाहिद राणा याच्या गोलंदाजीचा भारतीय फलंदाजांना व्यवस्थितरित्या सामना करता यावा आणि सरावासाठी भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीर याने नाहिद राणाला पर्याय म्हणून एका खास गोलंदाजाला पाचारण केले आहे.
येत्या 19 सप्टेंबर पासून भारत-बांगलादेश दरम्यान कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. त्यापुर्वी चार दिवसांच्या शिबिरामध्ये भारतीय प्रशिक्षकाने पंजाबच्या गुरूनूर ब्रारला पाचारण केले आले आहे. 24 वर्षांचा ब्रार हा सुमारे साडे सहा फूट उंच असून वेगवान गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. गुरूनूर ब्रारने आतापर्यंत केवळ पाच प्रथम श्रेणी सामने खेळाला असून, मागील आयपीएलच्या हंगामात तो पंजाब किंग्स संघांसोबत होता.
IND vs BAN : बांगलादेशचा संघ भारतात दाखल, ‘या’ तारखेला चेन्नईत होणार पहिला कसोटी सामना…
भारताचे नवीन गोलंदाजी प्रशिक्षक असणारे मॉर्नी मॉर्केल यांनी स्टार फलंदाजांना गोलंदाजी कशी करावी याबाबत सल्लामसलत केले. मुंबईचा फिरकीपटू हिमांशू सिंग, तामिळनाडूचा डावखुरा गोलंदाज एस अजित राम हे देखील सराव सत्रात सहभागी झाले होते. याचबरोबरीने आकाश दीप आणि यश दयाल यांनी वेगवान गोलंदाज बुमराह आणि सिराज यांच्यापेक्षा जास्त वेळ सराव केला.
येथील खेळपट्टी ही वेगवान आणि फिरकी अशा दोन्ही प्रकारच्या गोलंदाजाना साथ देणारी असू शकते. या खेळपट्टीवर अनेकदा चेंडू उसळी देखील मारतो, त्यामुळे नाहिद राणासारखे गोलंदाज भारतीय फलंदाजासाठी डोकेदुखी ठरू शकतात.





