IND vs BAN 2nd Test : कानपूर कसोटीत अश्विनला 3 मोठे विक्रम करण्याची संधी, WTC मध्येही रचणार इतिहास…

IND vs BAN 2nd Test : पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर आता टीम इंडिया कानपूर कसोटीसाठी सज्ज झाली आहे. चेन्नई कसोटीत भारताने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला. चेन्नई कसोटीत टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरलेला आर अश्विन आता कानपूर कसोटीतही खळबळ माजवण्यासाठी सज्ज झाला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात आर अश्विनच्या नावावर अनेक विक्रम झाले. त्यानंतर आता अश्विनला कानपूर कसोटीत तीन मोठे विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे.
1. आर अश्विनने चेन्नई कसोटीत 6 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 750 बळी पूर्ण केले होते. आता या यादीत अश्विन श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज चामिंडा वासला मागे टाकू शकतो. वास्तविक, चामिंडा वासच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 761 विकेट्सची नोंद आहे. अश्विन त्याच्या 11 विकेट्सने मागे आहे. अश्विन कानपूर कसोटीत 12 विकेट घेऊन हा विक्रम मोडू शकतो.
2. कानपूर कसोटीत अश्विनला कसोटी क्रिकेटमधील सातवा सर्वात यशस्वी गोलंदाज बनण्याची संधी असेल. सध्या ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज 530 विकेट्ससह सातव्या स्थानावर आहे. अश्विनच्या नावावर सध्या 522 विकेट्स आहेत. अश्विननं दुसऱ्या कसोटीत 9 विकेट्स घेतल्यास तो कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीत 7 व्या क्रमांकावर पोहचेल.
IND vs BAN 2nd Test : कानपूर कसोटीत कोहलीला इतिहास रचण्याची संधी, फक्त 129 धावांची आहे आवश्यकता…
3. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये, आर अश्विनने 2019 पासून 36 सामन्यांत 180 बळी घेतले आहेत. जो WTC चा दुसरा यशस्वी गोलंदाज आहे. तर ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन या यादीत पहिल्या स्थानावर आहे, ज्याच्या नावावर 43 सामन्यांमध्ये 187 विकेट आहेत. आता अश्विन आणखी 8 विकेट घेऊन हा विक्रम आपल्या नावावर करू शकतो म्हणजेच अव्वलस्थान मिळवू शकतो.





