IND vs BAN 1st T20 : अर्शदीप-वरुणचा कहर, बांगलादेशचं टीम इंडियासमोर माफक धावांचे लक्ष्य…

India vs Bangladesh 1st T20 Score Update : – बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने जिंकल्यानंतर टीम इंडियाची नजर आता टी-20 मालिकेवर आहे. आगामी तीन सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ पूर्णपणे तयार आहे. या दोघांमधील पहिला सामना आज ग्वाल्हेरच्या श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजल्यापासून खेळवला जात आहे, ज्यामध्ये भारतीय संघ विजयासह 1-0 अशी आघाडी घेण्याचे लक्ष्य ठेवणार आहे.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेगवान गोलंदाज मयंक यादव आणि नितीश रेड्डी यांनी भारतासाठी पदार्पण केले आहे. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि फिरकीपटू वरुण चक्रवर्तीच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे भारताने बांगलादेशचा डाव 19.5 षटकांत 127 धावांत संपुष्टात आला. त्यामुळे बांगलादेशने पहिल्या सामन्यात भारतासमोर विजयासाठी 128 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Innings Break!
A magnificent bowling performance restricts Bangladesh to 127 👏👏#TeamIndia‘s chase coming up shortly ⏳
Scorecard – https://t.co/Q8cyP5jXLe#INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Gu6wQLPXxg
— BCCI (@BCCI) October 6, 2024
बांगलादेशकडून मेहदी हसन मिराझने 32 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने नाबाद सर्वाधिक 35 धावा केल्या. कर्णधार नजमुलने 25 चेंडूंचा सामना करत 27 धावा केल्या. तौहीद आणि तस्किन अहमद प्रत्येकी 12 धावा करून बाद झाले. याशिवाय कोणीही विशेष काही कामगिरी करू शकले नाही.
अर्शदीपने बांगलादेशला सुरुवातीचे धक्के दिले ज्यातून संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही आणि त्याची फलंदाजी खूपच खराब झाली. तीन वर्षांनंतर भारतासाठी टी-20 सामना खेळून परतलेल्या वरुणने पुनरागमन करताना छाप पाडली, तर अर्शदीपनेही तगडी गोलंदाजी करत बांगलादेशला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. मयंक यादवने आपल्या टी-20 कारकिर्दीतील पहिलेच षटक निर्धाव टाकले आणि एक विकेट घेण्यातही तो यशस्वी ठरला. एकूणच या सामन्यात भारतीय गोलंदाजी उत्कृष्ट होती.
Women’s T20 World Cup 2024 : टीम इंडियानं पुन्हा मारलं मैदान, पाकचा 6 विकेट्स राखून केला पराभव…
भारताकडून गोलंदाजीत वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग यांनी भारतासाठी घातक गोलंदाजी केली. अर्शदीपने 3.5 षटकात 14 धावा देत 3 बळी घेतले. वरुणने 4 षटकात 31 धावा देत 3 बळी घेतले. हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर आणि मयंक यादव यांनीही प्रत्येकी 1 बळी घेतला.





