India vs Australia Test series 2024/25 :- ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज सॅम कॉन्स्टासने एमसीजीवर झालेल्या बॉर्डर-गावस्कर कसोटीतील पहिल्या डावात भारताचा अव्वल गोलंदाज जसप्रीत बुमराहविरुद्ध आक्रमक धोरण अवलंबले होते. त्याने बुमराहच्या एकाच षटकांत 18 धावा चोपल्या होत्या. बुमराह विरुद्ध खेळताना अशाच प्रकारची आक्रमक मानसिकता ऑस्ट्रेलीयाच्या सर्व खेळाडूंनी अवलंबवावी, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने व्यक्त केले आहे. मेलबर्न कसोटीनंतर ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. मेलबर्न येथील चौथ्या कसोटीत एकोणीस वर्षीय कॉन्स्टासने कसोटी पदार्पण करताना 65 चेंडूत 60 धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाने ही कसोटी १८४ धावांनी जिंकली. या संदर्भात बोलताना वॉर्नर म्हणाला, कॉन्स्टासची खेळी खूप खास होती. लोक त्याच्यावर टीकाही करतील. पण हा त्याचा नैसर्गिक खेळ आहे आणि तो तसा खेळणार आहे. तुम्हाला हे बुमराहसारख्या जागतिक गोलंदाजाविरुद्ध असे करावे लागेल. दुसऱ्या डावात बुमराहने कॉन्स्टाससाठी थर्ड मॅन आणि फाइन लेगवर खेळाडू तैनात केले होते.’ पंतप्रधान इलेव्हनकडून खेळताना कॉन्स्टासने भारताविरुद्ध 97 चेंडूत 107 धावा केल्या आणि एमसीजीमध्ये भारत अ विरुद्ध 73 धावांची नाबाद खेळी खेळली. वॉर्नर म्हणाला, “पंतप्रधान इलेव्हनसाठी त्याच्या खेळीने हे सिद्ध केले होते की तो केवळ प्रतिभावानच नाही तर लढवय्या देखील आहे. 50 पेक्षा अधिक कसोटी सामने खेळलेल्या खेळाडूंनीही धैर्याने फलंदाजी करायला हवी होती. त्यांनी ही क्रीजमधून बाहेर येऊन शॉट्स खेळायला हवे होते. बुमराहसमोर फलंदाजांना नशीबाची साथ हवी… या मालिकेत 30 बळी टिपणाऱ्या जसप्रीत बुमराहचे कौतुक करताना तो म्हणाला, तुम्हाला आशा असेल की तो शेवटच्या कसोटीत दमदार कामगिरी करू शकणार नाही. मात्र तो एक हुशार खेळाडू आहे. त्याची कामगिरी उत्कृष्ट आहे. त्याच्यावर दबाव टाकणे खूप कठीण आहे. ‘उज्जी’ (उस्मान ख्वाजा) पहिल्या स्पेलमध्ये त्याचे फक्त दोन चेंडू खेळू शकला.बुमराहसमोर खेळताना फलंदाजांनाही नशीबाची साथ आवश्यक आहे, असे डेव्हिड वॉर्नर बोलताना म्हणाला. WTC Final 2025 : भारत-ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी समान राहिल्यास काय होईल, कोण करेल अंतिम फेरीत प्रवेश; जाणून घ्या… स्टार्कच्या फिटनेसमुळे चिंता… बॉक्सिंग डेच्या तिसऱ्या दिवसापासून वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क बरगडी सुजल्याने त्रस्त होता, त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. वेदना स्टार्क थांबवू शकला नाही. सुरुवातीचा स्पेल वागलाता त्याने चांगली गोलंदाजी करताना कोहलीला बाद केले. मात्र, आगामी कसोटीसाठी तो कशा प्रकारे तंदुरुस्त होईल, हे आम्ही पाहतो आहोत, खेळपट्टी पाहून स्टार्कविषयी निर्णय घेतला जाईल, असे ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्रू मॅकडोनाल्ड म्हणाले