IND vs AUS : “बॅग ‘लिमिटेड एडिशन’, पण…”, गिल-अर्शदीपने अभिषेक शर्माच्या बॅगची उडवली टिंगल, VIDEO होतोय व्हायरल

Abhishek Sharma Bag Funny Video Viral : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना बुधवारी कॅनबेरामध्ये पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर भारतीय संघ गुरुवारी दुसऱ्या सामन्यासाठी मेलबर्नला पोहोचला. बीसीसीआयने सोशल मीडियावर संघाच्या मेलबर्न दाखल होण्याच्या छायाचित्रे आणि व्हिडीओ शेअर केले आहेत, ज्यात सूर्यकुमार यादव, अक्षर पटेलसह इतर खेळाडू दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये गिल आणि अर्शदीप सिंग यांनी अभिषेक शर्माच्या बॅगची मस्करी करताना दिसत आहेत.
खेळाडूंच्या मजेदार क्षणांचा व्हिडीओ व्हायरल –
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अर्शदीप सिंगने अभिषेक शर्माच्या ‘लिमिटेड एडिशन’ बॅगवरुन टिंगला उडवली. बसमधून उतरून हॉटेलकडे जाताना शुबमन गिल आणि अर्शदीप यांनी अभिषेकच्या खास बॅगकडे लक्ष वेधले. अर्शदीप म्हणाला, “ही बॅग ‘लिमिटेड एडिशन’ आहे,” जी बॅगच्या डिझाइन आणि कदाचित जुन्या स्टाइलवर आधारित चेष्टा होती. यावर गिलने उत्तर दिले, “बॅग लिमिटेड एडिशन आहे आणि त्यात खूप लिमिटेशन्सही आहेत.” हा मजेदार क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
🎥 𝘼𝙪𝙨𝙩𝙧𝙖𝙡𝙞𝙖𝙣 𝙏𝙧𝙖𝙫𝙚𝙡 𝘿𝙞𝙖𝙧𝙞𝙚𝙨#TeamIndia reach Melbourne for 2nd #AUSvIND T20I 🛬 👌 pic.twitter.com/MIadTIuEWz
— BCCI (@BCCI) October 30, 2025
पहिल्या सामन्यात पावसामुळे आला होता व्यत्यय –
Shubmangill teasing Abhishek sharma 🤣#ShubmanGill #abhisheksharma pic.twitter.com/MZQUie8Jzn
— 𝑆𝓃𝑒𝒽𝒶77🪞✨ (@xo_sneha77) October 30, 2025
कॅनबेरामधील सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने वेगवान सुरुवात करण्याच्या प्रयत्नात अभिषेक शर्मा नॅथन एलिसच्या षटकात बाद झाला. मात्र, यानंतर पाऊस आल्याने सामना प्रत्येकी १८-१८ षटकांचा करण्यात आला. पुन्हा खेळ सुरू झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल यांनी धडाकेबाज फलंदाजी केली. दोन्ही फलंदाज आपापल्या अर्धशतकाकडे वाटचाल करत होते, पण पुन्हा पाऊस आल्याने सामना रद्द करावा लागला.
हेही वाचा – IND W vs AUS W : फोबी लिचफिल्डचा भारताविरुद्ध कहर! शतक एक अन् विक्रम अनेक
भारतीय संघ आता मेलबर्नमध्ये दुसऱ्या टी-२० सामन्याची तयारी करत आहे. मालिकेतील उर्वरित सामन्यांकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.





