IND vs AUS : रोहितची दमदार खेळी, शतक हुकले पण ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय

IND vs AUS Rohit Sharma create record : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ॲडलेडच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने दमदार पुनरागमन करत अर्धशतकी खेळी केली आणि एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. सात महिन्यांनंतर वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या रोहितला मालिकेतील पहिल्या सामन्यात पर्थ येथे केवळ ८ धावाच करता आल्या होत्या.
परंतु, ॲडलेड येथे दुसऱ्या वनडेत त्याने संयमाने फलंदाजी करत मोठे फटके खेळले आणि ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. रोहितने या सामन्यात ६ धावा काढताच हा ऐतिहासिक टप्पा गाठला. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली (८०२ धावा), तिसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर (७४० धावा), चौथ्या क्रमांकावर एमएस धोनी (६८४ धावा) आणि पाचव्या क्रमांकावर शिखर धवन (५१७ धावा) यांचा समावेश आहे.
𝐌𝐄𝐄𝐓 𝐓𝐇𝐄 𝐅𝐈𝐑𝐒𝐓 𝐈𝐍𝐃𝐈𝐀𝐍 𝐁𝐀𝐓𝐒𝐌𝐀𝐍 𝐓𝐎 𝐒𝐂𝐎𝐑𝐄 𝟏𝟎𝟎𝟎 𝐎𝐃𝐈 𝐑𝐔𝐍𝐒 𝐀𝐆𝐀𝐈𝐍𝐒𝐓 𝐀𝐔𝐒𝐓𝐑𝐀𝐋𝐈𝐀 𝐎𝐍 𝐓𝐇𝐄𝐈𝐑 𝐒𝐎𝐈𝐋! 🇮🇳🔥
The one & only Hitman, achieving this incredible milestone for Team India! 💙💪#RohitSharma #AUSvIND #ODIs… pic.twitter.com/Q7nqGRhPcJ
— Sportskeeda (@Sportskeeda) October 23, 2025
ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज:
1. रोहित शर्मा – १०००* धावा
2. विराट कोहली – ८०२ धावा
3. सचिन तेंडुलकर – ७४० धावा
4. एमएस धोनी – ६८४ धावा
5. शिखर धवन – ५१७ धावा
हेही वाचा –शुभमन गिलसोबत हात मिळवला आणि थेट…; पाकिस्तान चाहत्याचे नापाक कृत्य, Video Viral
रोहित शर्माच्या रूपाने भारताला तिसरा धक्का बसला. रोहित चांगली फलंदाजी करत होता आणि शतकाच्या दिशेने वाटचाल करत होता, पण ब्रेकपूर्वी त्याने आपली विकेट गमावली. रोहित ९७ चेंडूत ७३ धावा काढून बाद झाला, त्याने सात चौकार आणि दोन षटकार मारले. रोहित आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी केली, जी मिचेल स्टार्कने मोडली. रोहितच्या या खेळीने भारतीय संघाला दुसऱ्या वनडेत मजबूत पायावर उभे केले असून, त्याच्या या विक्रमी कामगिरीने चाहत्यांमध्ये उत्साह संचारला आहे.





