शुभमन गिलसोबत हात मिळवला आणि थेट…; पाकिस्तान चाहत्याचे नापाक कृत्य, Video Viral

Shubhman Gill | टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून यावेळी तीन सामन्यांची वनडे सिरीज आणि ५ सामन्यांची टी-२० सिरीज खेळवण्यात येणार आहे. आज (23 ऑक्टोबर) भारत आणि ऑस्ट्रेलियात दुसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात येणार आहे. त्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिलचा ऑस्ट्रेलियामधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये दिसते की, शुभमन गिल अॅडलेडच्या रस्त्यांवर फेरफटका मारत होता. यादरम्यान एक चाहता शुभमन गिलसोबत हस्तांदोलन करण्यासाठी आला. शुभमन गिलने हात मिळवताचा त्या चाहत्याने ‘पाकिस्तान झिंदाबाद’ असं म्हंटले. यावर मात्र शुभमन गिलने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र या पाकिस्तानी चाहत्याची नापाक हरकत पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
A Pakistani fan met Shubman Gill in Adelaide and said, “Pakistan Zindabad.” 🇵🇰🇮🇳🔥 pic.twitter.com/2NVLpjwFo7
— Cric Passion (@CricPassionTV) October 22, 2025
दरम्यान, या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 7 विकेट्सने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यांचा दुसरा एकदिवसीय सामना आज 23 ऑक्टोबर रोजी अॅडलेडमध्ये खेळवला जाईल. या मालिकेत टिकून राहण्यासाठी भारताला अॅडलेड एकदिवसीय सामना जिंकावा लागणार आहे. Shubhman Gill |
हेही वाचा:
post diwali detox diet: दिवाळीनंतर शरीर डिटॉक्स करण्यासाठी ५ सोपे उपाय





