IND vs AUS : वॉशिंग्टन-अर्शदीपच्या जोरावर भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय! मालिकेत १-१ ने साधली बरोबरी

IND vs AUS India defeated Australia by 5 wickets : होबार्ट येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच विकेट्सनी दणदणीत पराभव केला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारतासाठी पहिल्यांदा अर्शदीप सिंगने आणि नंतर वॉशिंग्टन सुंदरने महत्त्वाची भूमिका बजावली. अर्शदीपने ३ विकेट्स घेतल्या आणि वॉशिंग्टनने नाबाद ४९ धावांचे योगदान दिले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ६ बाद १८६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने १८.३ षटकांत ५ गडी गमावून १८८ धावा करत विजय मिळवला.
यापूर्वी, ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताला चार विकेट्सनी हरवले होते, तर पहिला सामना पावसामुळे वाया रद्द झाला होता. रविवारी होबार्टमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टिम डेव्हिड आणि मार्कस स्टोइनिस यांच्या अर्धशतकी खेळीच्या मदतीने भारतासमोर १८७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारतीय संघाने हे लक्ष्य वॉशिंग्टन सुंदरच्या वादळी ४९ धावांच्या खेळीच्या जोरावर सहज पार केले.
टिम डेव्हिड-स्टॉइनिसच्या अर्धशतकी खेळी ठरली व्यर्थ –
Effective 🤝 Economical
For his superb spell of 3⃣/3⃣5⃣, Arshdeep Singh wins the Player of the Match award 🥇
The T20I series is now levelled at 1⃣-1⃣ with 2⃣ matches to go.
Scorecard ▶ https://t.co/X5xeZ0Mc5a #TeamIndia | #AUSvIND | @arshdeepsinghh pic.twitter.com/ZaJaY9T2mz
— BCCI (@BCCI) November 2, 2025
ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली; तिसऱ्याच षटकात १४ धावांवर ट्रेव्हिस हेड आणि जोश इंग्लिश बाद झाले. त्यानंतर टिम डेव्हिडने ३८ चेंडूंत ७४ धावा (स्ट्राइक रेट १९४.७४) आणि मार्कस स्टॉइनिसने ३९ चेंडूंत ६४ धावा करून संघाला १८६ पर्यंत नेले. मॅथ्यू शॉर्टने २६ धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंगने ३, वरुण चक्रवर्तीने २ आणि शिवम दुबेने १ विकेट्स घेतली.
हेही वाचा – IND vs AUS : टिम डेव्हिडने गगनचुंबी षटकार ठोकत रचला इतिहास! तब्बल इतक्या मीटरचा लगावला सिक्स, पाहा VIDEO
वॉशिंगटन सुंदरची विस्फोटक ४९ धावांची खेळी –
Game. Set. Done ✅
Washington Sundar (49*) and Jitesh Sharma (22*) guide #TeamIndia to a 5-wicket victory in Hobart. 🙌
Scorecard ▶https://t.co/X5xeZ0LEfC #AUSvIND | @Sundarwashi5 | @jiteshsharma_ pic.twitter.com/gRXlryFeEE
— BCCI (@BCCI) November 2, 2025
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात १८६ धावांचा पाठलाग करताना वॉशिंगटन सुंदरने बल्ल्याने कमाल केली. मुश्किल प्रसंगी त्याने अवघ्या २३ चेंडूंत नाबाद ४९ धावा फटकारल्या, स्ट्राइक रेट २१३ राहिला. सुरुवातीला अभिषेक शर्माने २५, कर्णधार सूर्यकुमार यादवने २४, तिलक वर्माने २५ आणि जितेश शर्माने २२ धावांचे योगदान दिले.
हेही वाचा – Ajit Pawar : अजित पवारांची विजयी घोडदौड कायम! महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा नियुक्ती
ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज ठरले अपयशी –
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना त्यांच्या फलंदाजांनी उभारलेल्या १८६ धावांचा बचाव करता आला नाही. नॅथन एलिसने ४ षटकांत ३६ धावा देत ३ विकेट घेतले. जेवियर बार्टलेट आणि मार्कस स्टॉइनिसला प्रत्येकी १ विकेट्स घेतली.





