IND vs AUS 5th Test: रोहितला वगळल्यानंतरही भारतीय संघाची तीच स्थिती, पहिल्या डावात 185 धावांवर गारद

IND vs AUS 5th Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील 5व्या व अंतिम कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराहने टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र, नियमित कर्णधार रोहित शर्माला वगळल्यानंतरही भारतीय संघाची मागील कसोटीप्रमाणेच स्थिती झाल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या डावात भारतीय संघ 72.2 ओव्हर्समध्ये सर्वबाद 185 धावांपर्यंत मजल मारू शकला. तर पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलिया संघाने 1 विकेट गमावत 9 धावा केल्या.
खराब कामगिरीमुळे या सामन्यात रोहित शर्माला संघात स्थान मिळाले नाही. पहिल्यांदा बॅटिंगसाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. अवघ्या 11 धावांवर भारताची पहिली विकेट गेली. केएल राहुल केवळ 4 धावा करून आऊट झाला. तर मागच्या सामन्यात उत्तम कामगिरी करणारा यशस्वी जैस्वाल देखील मोठी खेळी करू शकला नाही. तो 10 धावांवर बाद झाला.
Stumps on Day 1 in Sydney!
Captain Jasprit Bumrah with the opening wicket for #TeamIndia 🙌
Australia 9/1, trail by 176 runs.
Scorecard – https://t.co/NFmndHLfxu#AUSvIND pic.twitter.com/Z3tFKsqwM2
— BCCI (@BCCI) January 3, 2025
त्यानंतर आलेल्या गिल आणि विराट कोहलीने अनुक्रम 20 आणि 17 धावा केल्या. भारताकडून विकेटकिपर रिषभ पंतने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. तर रविंद्र जडेजाने 26 आणि जसप्रीत बुमराहने 22 धावा केल्या. मागच्या सामन्यातील शतकवीर नितीश कुमार रेड्डीला या सामन्यात खातेही उघडता आले नाही. भारताच्या इतर कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी खेळण्यास यश आले नाही.
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडून बोलंडने सर्वाधिक 4 विकेट्स घेतले. तर मिचेल स्टार्कने 3, पॅट कमिन्सने 2 आणि नॅथन लायनने 1 विकेट घेतले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघाने 1 विकेट गमावत 9 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाला बुमराहने 2 धावांवर आऊट केले.





