IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! भारताला धूळ चारत ऑप्टसवर उघडलं विजयाच खातं

IND vs AUS Australia beat India by 7 wickets : ऑस्ट्रेलियाने पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाचा 7 गडी राखून दणदणीत पराभव केला. यासह ऑप्टस स्टेडियमवर प्रथमच विजय मिळवला. पावसामुळे 26 षटकांपुरता मर्यादित झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 136 धावाच केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने डकवर्थ-लुईस नियमानुसार मिळालेलं 131 धावांचं लक्ष्य अवघ्या 21.1 षटकांत 3 गडी गमावून सहज गाठलं. यासह तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
मिचेल मार्शने खेळली कर्णधारपदाला साजेशी खेळी –
लक्ष्याचा पाठलाग करताना, कर्णधार मिचेल मार्शने ऑस्ट्रेलियाकडून चांगली फलंदाजी केली आणि शेवटपर्यंत टिकून राहिला. मार्शला मात्र आपले अर्धशतक पूर्ण करता आले नाही. तो 52 चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकारांसह ४६ धावा करत नाबाद राहिला. मार्श व्यतिरिक्त, जोश फिलिपने 37 धावा केल्या, तर मॅट रेनशॉ 21 धावा करून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून, ट्रॅव्हिस हेडने आठ धावा आणि मॅथ्यू शॉर्टने आठ धावा केल्या. भारताकडून, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी एक विकेट्स घेतली.
रोहित-विराटची निराशाजनक कामगिरी –
Australia win the 1st ODI by 7 wickets (DLS method). #TeamIndia will look to bounce back in the next match.
Scorecard ▶ https://t.co/O1RsjJTHhM#AUSvIND pic.twitter.com/0BsIlU3qRC
— BCCI (@BCCI) October 19, 2025
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाचा उत्साह फार काळ टिकला नाही. दोघांनी मिळून केवळ 22 चेंडूंचा सामना केला आणि त्यांच्या खराब कामगिरीचा परिणाम भारतीय डावावर स्पष्ट दिसला. 26 षटकांच्या या सामन्यात भारतीय संघाला सुरुवातीपासूनच लय सापडली नाही. केएल राहुल (30 चेंडूत 38 धावा) वगळता एकही फलंदाज आत्मविश्वासाने खेळू शकला नाही.
ऑस्ट्रेलियाचा चतुर निर्णय –
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून ढगाळ वातावरण आणि वेगवान गोलंदाजांना पोषक खेळपट्टीचा फायदा घेत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, जो पूर्णपणे योग्य ठरला. भारतीय कर्णधार शुबमन गिलसह मैदानात उतरलेल्या रोहित शर्माचं प्रेक्षकांनी उत्साहाने स्वागत केलं, पण त्याची खेळी केवळ 14 चेंडू टिकली.
हेही वाचा – IND vs AUS : शुबमन गिलने पहिल्याच सामन्यात रचला इतिहास! एमएस धोनीचा मोडला खास विक्रम
मालिकेतील पुढील लढत –
भारतीय संघाला आता मालिकेतील दुसऱ्या सामन्यात जोरदार पुनरागमन करावं लागेल, तरच मालिका जिवंत ठेवण्याची आशा कायम राहील. ऑस्ट्रेलियाच्या दमदार खेळासमोर भारताला फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर सुधारणा करावी लागेल.





