IND Vs AUS 4th Test: भारत-ऑस्ट्रेलिया सामना सुरू असतानाच मैदानाबाहेर खलिस्तानी-भारतीय समर्थक एकमेकांना भिडले, व्हीडिओ आला समोर

IND Vs AUS 4th Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघामध्ये सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत 5 सामन्यांची कसोटी सीरिज खेळली जात आहे. या सीरिजमधील चौथ्या कसोटी सामन्याला आजपासून मेलबर्न येथे सुरूवात झाली. मात्र, या सामन्याच्या आधी मैदानाबाहेर खलिस्तानी आणि भारतीय समर्थक एकमेकांना भिडल्याचे समोर आले. या घटनेचा व्हीडिओ समोर आला आहे.
काही लोक खलिस्तानी झेंडा घेऊन मैदानाबाहेर जमा झाले होते. तसेच, यावेळी त्यांच्याकडून भारतविरोधी घोषणाबाजी केली जात होती. या घोषणाबाजीला भारतीयांना विरोध केला. भारतीय समर्थकांना भारत जिंदाबादच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. या घोषणाबाजीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Confrontation at the MCG: Indian fans clashed with Khalistan supporters, who were removed by Victoria Police. The Khalistanis, without tickets, arrived in the morning solely to create a ruckus. Order restored swiftly. #BoxingDayTest #MCG #BGT #INDvsAUS pic.twitter.com/8iEsW957gD
— Ankan Kar (@AnkanKar) December 25, 2024
आजपासून (26 डिसेंबर) भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. एकीकडे सामना सुरू असताना दुसरीकडे मैदानाबाहेर खलिस्तानी-भारतीय समर्थक समोरासमोर आल्याचे दिसून आले. सामन्याचे तिकीट नसतानाही खलिस्तानी समर्थकांनी तेथे पोहोचून गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती. घटनेनंतर पोलिसांकडून समर्थकांना तेथून बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे.





