IND vs AUS 4th Test : कोहलीचा ज्याच्यासोबत झाला होता वाद; त्याच्या नावावर नोंदवला गेला विश्वविक्रम…

IND vs AUS 4th Test (Virat Kohli vs Sam Konstas) : विराट कोहली आणि सॅम कॉन्स्टन्स यांच्यातील वाद अद्याप शमलेला नाही. मेलबर्न कसोटीदरम्यान सोशल मीडियावर याची बरीच चर्चा झाली. मेलबर्न येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा कसोटी सामना हा कॉन्स्टन्सच्या कारकिर्दीतील पदार्पण सामना आहे. त्याचा हा पहिलाच कसोटी सामना होता. या सामन्यात मैदानात उतरताच कॉन्स्टासने एक खास विक्रम आपल्या नावावर केला. मोहम्मद कैफशी संबंधित एका खास यादीत त्याने स्थान मिळवले आहे.
पदार्पणातच एक खास विक्रम….
वास्तविक, सॅम कॉन्स्टन्स अंडर 19 ऑस्ट्रेलियन संघाचा एक भाग होता. या वर्षी फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाने अंडर-19 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले होते. त्यांनी भारताचा पराभव केला होता. कॉन्स्टन्स हा त्या सामन्याचा एक भाग होता आणि या वर्षी 26 डिसेंबर रोजी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये संघासाठी पदार्पण केले. यासह कॉन्स्टासने पदार्पणातच एक खास विक्रम आपल्या नावावर केला. वास्तविक, 19 वर्षाखालील विश्वचषक जिंकून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कॉन्स्टासचा समावेश झाला आहे.
कॉन्स्टन्स ‘कैफ आणि पृथ्वी शॉ’च्या यादीत झाला सामील…
कैफ आणि पृथ्वी शॉ हे असे खेळाडू आहेत, ज्यांनी अंडर-19 विश्वचषक विजेतेपद पटकावून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारतीय संघाकडून खेळताना कैफने अंडर-19 विश्वचषक 2000 चे विजेतेपद पटकावले होते. त्यादरम्यान, टीम इंडियाने फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव केला होता आणि कैफने याच वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. तसेच पृथ्वी 2018 च्या अंडर-19 विश्वचषक विजेत्या टीम इंडियाचा भाग होता आणि त्याच वर्षी त्याने भारताकडून वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. आता, या यादीत ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षीय सॅम कॉन्स्टन्सच्या नावाचाही समावेश झाला आहे.
कोहली आणि कॉन्स्टन्समध्ये काय झाले होते…
एमसीजी कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचा वरिष्ठ खेळाडू विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणारा सॅम कॉन्स्टास यांच्यात वादविवाद झाला. 10 व्या षटकात कोहली आणि कॉन्स्टास यांची खेळपट्टीवर टक्कर झाल्याची घटना घडली. यानंतर लगेचच दोन्ही खेळाडूंमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली पण ती फार काळ टिकली नाही आणि उस्मान ख्वाजा तसेच पंचानी यामध्ये मध्यस्थी केली. या घटनेनंतर मॅच रेफरीने कोहलीला त्याच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावला तसेच एक डिमेरिट पॉइंटही दिला.





