Ind vs Aus 3rd ODI : स्मृती मंधानाने मोडला शतकांचा महारेकाॅर्ड, ‘अशी’ कामगिरी करणारी ठरली पहिली महिला क्रिकेटपटू…

Ind vs Aus 3rd ODI (Smriti Mandhana) : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना शतक झळकावण्यात यशस्वी ठरली. ब्रिस्बेनमधील ॲलन बॉर्डर मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांतील पराभवानंतर तिसरा सामना पर्थमध्ये खेळवला गेला.
𝗛𝗨𝗡𝗗𝗥𝗘𝗗!
Vice-captain Smriti Mandhana with her 9th ODI TON! 🙌
Superb knock from the #TeamIndia vice-captain! 👏👏
LIVE ▶️ https://t.co/pdEbkwGszg#AUSvIND | @mandhana_smriti pic.twitter.com/XnxJOqxDBw
— BCCI Women (@BCCIWomen) December 11, 2024
या सामन्यापूर्वी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियन संघाला मोठी धावसंख्या [298/6(50)] उभारण्यात यश आले. प्रत्युत्तरात स्मृती मंधानाने संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि वर्षातील चौथे शतक झळकावले.
स्मृतीने रचला इतिहास…
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात स्मृती मंधानाने 103 चेंडूत शतक पूर्ण केले. यादरम्यान तिने 14 चौकार आणि 1 षटकार लगावला. मात्र, शतकानंतर ती जास्त वेळ क्रीजवर राहू शकली नाही आणि 105 धावा करून बाद झाली. 2024 मधील तिचे हे चौथे वनडे शतक होते. यासह ती महिला क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक शतके झळकावणारी खेळाडू ठरली. महिला वनडे क्रिकेटमध्ये 7 खेळाडूंनी एका वर्षात 3 शतके झळकावण्याचा पराक्रम केला आहे. पण मंधाना ही एका वर्षात 4 वेळा 100 चा आकडा गाठणारी पहिली खेळाडू ठरली आहे.
महिला वनडेत सर्वाधिक शतके…
स्मृती मंधानाने या खेळीसह तिच्या एकदिवसीय कारकिर्दीत 9 शतके पूर्ण केली आहेत. यासह, ती भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारी फलंदाज देखील ठरली आहे. याशिवाय, महिला वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत ती चौथ्या स्थानावर आली आहे. स्मृती मंधाना व्यतिरिक्त नॅट सायव्हर ब्रंट, शार्लोट एडवर्ड्स आणि चामरी अटापट्टू यांनी देखील एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रत्येकी 9 शतके झळकावली आहेत. त्याचवेळी, मेग लॅनिंग 15 शतकांसह या यादीत आघाडीवर आहे.





