India Women vs Australia Women 2nd ODI : ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटमध्ये भारतीय संघाला दुहेरी फटका बसला आहे. ॲडलेड कसोटी सामन्यात भारतीय पुरुष संघाचा दारूण पराभव झाल्यानंतर महिला संघाबाबतही असेच घडले आहे. ब्रिस्बेन येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात महिलांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Win for Australia in the 2nd #AUSvIND ODI!
The third & final match of the series to be played on December 11 in Perth.
Scorecard ▶️ https://t.co/gRsQoSo5LR #TeamIndia pic.twitter.com/Q9KDFjbSFH
— BCCI Women (@BCCIWomen) December 8, 2024
वास्तविक, रविवारी ब्रिस्बेन येथील ॲलन बॉर्डर फील्ड येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने भारतीय महिला संघाचा 122 धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय महिला क्रिकेट संघावर 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता उभय संघांमधील मालिकेतील तिसरा सामना 11 डिसेंबर 2024 रोजी पर्थ येथील वेस्टर्न ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशन मैदानावर खेळवला जाईल.
भारता विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 षटकात 8 गडी गमावून 371 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 44.5 षटकांत 249 धावांवर सर्वबाद झाला. अशाप्रकारे भारतीय महिला क्रिकेट संघाला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 122 धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.
एलिस पेरीचे दमदार शतक…
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची सुरुवात चांगली झाली. फोबी लिचफिल्ड (60) आणि जॉर्जिया वोल या सलामीच्या जोडीने 116 चेंडूत 130 धावांची भागीदारी करत मजबूत धावसंख्येचा पाया रचला. फोबी लिचफिल्ड 63 चेंडूंत 8 चौकार आणि 1 षटकारासह 60 धावा करून बाद झाली. यानंतर जॉर्जियाने एलिस पेरीसोबत दुसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी केली. जॉर्जिया वोल 87 चेंडूंत 12 चौकारांसह शतक (101) झळकावल्यानंतर बाद झाली. जॉर्जिया बाद झाल्यानंतर पेरीने आक्रमक फलंदाजी सुरू ठेवली आणि बेथ मुनी (56) सोबत 69 चेंडूत 98 धावांची भागीदारी केली आणि भारतीय गोलंदाजांना पुनरागमनाची संधी दिली नाही. एलिस पेरीने 75 चेंडूत 7 चौकार आणि 6 षटकारांसह 105 धावांची खेळी केली. एलिस पेरीला तिच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
Ind vs Aus 1st ODI : टीम इंडियाचा पहिल्याच वनडेत पराभव, ऑस्ट्रेलियानं 5 विकेट्सने मिळवला विजय….
ऋचा घोषची संघर्षमय खेळी
विजयासाठी 372 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. स्मृती मानधना (9) हिला बाद करून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतीय संघावर दबाव आणला. मात्र, ऋचा घोषने एका टोकाला संयम राखून दुसऱ्या विकेटसाठी हरलीन देओल (12) सोबत 44 चेंडूत 29 धावांची आणि तिसऱ्या विकेटसाठी हरमनप्रीत कौरसोबत 69 चेंडूत 66 धावांची भागीदारी करत भारताचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. रिचा घोष बाद झाल्यानंतर भारताने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. ऋचा घोष 72 चेंडूंत 8 चौकारांसह अर्धशतक (54 धावा) झळकावून बाद झाली. तिच्याशिवाय कर्णधार हरमनप्रीत कौर (38), जेमिमाह रॉड्रिग्स (43) आणि मिन्नू मणी (नाबाद 46) यांनाच काही प्रमाणात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना करता आला आणि भारतीय संघ 44.5 षटकात 249 धावांवर सर्वबाद झाला.
IND vs AUS 2nd Test : दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियावर दणदणीत विजय; मालिकेत साधली बरोबरी..
ॲनाबेल सदरलँड सर्वात यशस्वी गोलंदाज…
ॲनाबेल सदरलँड ही ऑस्ट्रेलियासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने 8.5 षटकात 39 धावा देत 4 बळी घेतले. तिच्या व्यतिरिक्त मेगन शट, किग गर्थ, ऍशले गार्डनर, सोफी मोनिलेक्स आणि अलाना किंग यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. भारताकडून गोलंदाजीत साइमा ठाकूरने सर्वाधिक 3 आणि मिन्नू मणीने 2 तर रेणुका सिंग, दीप्ती शर्मा आणि प्रिया मिश्राने प्रत्येकी 1 बळी घेतला.